Students Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात दहावीचा निकाल 99.72 टक्के

राज्यातील (Goa) दहावीचा निकाल 99.72 टक्के लागला आहे. मागील वर्षी 92.69 टक्के निकाल लागला होता.

अवित बगळे

पणजी: राज्यातील (Goa) दहावीचा निकाल 99.72 टक्के लागला आहे. मागील वर्षी 92.69 टक्के निकाल लागला होता. कोरोना संकटामुळे (Covid 19) दहावीच्या परिक्षा रद्द करून अंतर्गत मुल्यांकनाद्वारे प्रत्येक हायस्कूलमध्ये निकाल समिती स्थापन करून हा निकाल तयार करण्यात आला आहे. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे(Goa Board of Secondary and Higher Secondary Education) अध्यक्ष भगिरथ शेट्ये (Bhagirath Shetty) यांनी आज पर्वरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला.

कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन यंदा दहावीच्या व बारावीच्या अंतिम परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्याकण गुणांच्या आधारे, नववीच्या गुणांच्या आधारे तसेच यापूर्वी झालेल्या चाचनी परिक्षांच्या गुणांच्या आधारे आणि प्रत्येक हायस्कूलमध्ये खास स्थापन केलेल्या निकाल समित्यांच्या अहवालानुसार गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती शेट्ये यांनी दिली.

यंदा दहावीसाठी 23,967 नियमीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, तर 517 पुन्हा बसलेले (रिपीटर्स) विद्यार्थी होते. यात मुलांची संख्या 13,011, तर मुलींची संख्या 10,956 आहे. दहावीच्या एकूण 23 हजार 967 विद्यार्थ्यापैकी 23900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकाल 99.72 टक्के लागला आहे. 13 हाजर 11 विद्यार्थ्यांपैकी 12 हजार 946 विद्यार्थी उत्तीर्ण झाले (निकाल 99.5 टक्के), तर 10 हजार 956 विद्यार्थिनींपैकी 10954 विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या (निकाल 99.72 टक्के).

या परीक्षेत 67 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 2 हजार 231 विद्यार्थ्यांनी 33 ते 45 टक्के गुण मिळवले. 7 हजार 1 जणांनी 46 ते 59 टक्के गुण मिळवले. 10 हजार 276 जणांनी 60 ते 80 टक्के तर 4 हजार 392 जणांनी 81 ते 100 टक्के गुण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT