Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

हाय गर्मी...! गोव्यात पारा चढला, एप्रिलमध्ये 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पणजीचे कमाल तापमान एप्रिलमध्ये तीन दिवस 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.

दैनिक गोमन्तक

एप्रिलमध्ये सर्वाधिक ३६.२ अंश तापमान

पणजी : राज्यात यंदा एप्रिलमधील सर्वाधिक कमाल 36.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. यापूर्वी 7 एप्रिल 1989 रोजी पणजी येथील सर्वाधिक तापमान 39.8 अंश सेल्सिअस इतके होते. (Goa Temperature rose to more than 36 degrees Celsius in April)

पणजीचे कमाल तापमान एप्रिलमध्ये तीन दिवस 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. एप्रिल 2012 मध्ये 9 दिवस कमाल तापमान 35 अंशांपेक्षा अधिक होते. यंदाच्या एप्रिलमध्ये 4 दिवस पणजीचे किमान तापमान 27 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. एप्रिलमध्ये सर्वाधिक किमान तापमान 27 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक एप्रिल 1973 मध्ये 18 दिवस होते. शनिवारी पणजी येथे सर्वाधिक कमाल 34.2 अंश सेल्सिअस, तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी तापमान कमी असले, तरी हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उष्म्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे लोकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. शनिवारी राज्यात 79 टक्के आर्द्रतेची नोंद झाली. तापमान जरी वाढले नसले, तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे उष्म्यात वाढ होऊन लोक घामाघूम झालेले दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT