कळंगुट: सरकारकडून राज्यात कॅब अॅग्रिकेटर्स नियमावली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालकांनी गुरुवारी (२९ मे) आक्रोश केला. या नियमावलीचा विरोध करत त्यांनी गुरुवारी सकाळी हणजूण पोलिस स्थानकावर धडक दिली. तेथे पालिसांनी त्यांना गेटवरच अडवले. यामुळे वातावरण तंग झाले.
सरकारकडून हजारो स्थानिक टॅक्सीचालकांना खासगी कंपन्यांच्या गुलामगिरीखाली आणण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, स्थानिक टुरिस्ट टॅक्सी चालक तसेच मालक सरकारचा हा डाव पूर्ण ताकदिनिशी उधळून लावणार असल्याचा इशारा टॅक्सी चालक संघटनेचे नेते योगेश गोवेकर यांनी हणजुणात दिला.
दरम्यान, योगेश गोवेकर यांना अटक होणार असल्याची अफवा पसरल्यानेही टुरिस्ट टॅक्सीचालक आक्रमक बनले. यावेळी शिवोली काँग्रेस गट समितीच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, कपिल कोरगावकर तसेच अन्य पदाधिकारी टॅक्सी चालकांसमवेत हणजूण पोलिस स्थानकात उपस्थित होते.
टॅक्सीचालकांना पोलिसांनी रोखले
हणजूण पोलिस स्थानक इमारत परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या टॅक्सीचालकांना येथील मुख्य दरवाजाकडेच पोलिसांनी अडवून ठेवले होते. हणजूणचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी स्वतः गेटपाशी येत टॅक्सीचालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व आंदोलनकर्त्या पाच प्रमुख नेत्यांना बोलावून आपल्या केबिनमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात टॅक्सीचालक ठाण मांडून होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.