Taxi Driver Attacked In Goa 
गोवा

Taxi Driver Attacked In Goa: पैशांवरुन वाद! थिवी येथे प्रवाशाकडून टॅक्सी चालकावर सुरी हल्ला

Taxi Driver Attacked In Goa: यात टॅक्सी चालक सावंत यांच्या मानेवर डोक्यात आणि कपाळावर गंभीर जखम झाली आहे.

Pramod Yadav

Taxi Driver Attacked In Goa

थिवी येथे प्रवाशाकडून टॅक्सी चालकावर सुरी हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यात टॅक्सी चालक जखमी झाला असून, त्याला उपाचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, कोलवाळ पोलिसांनी संशयित प्रवाशाला अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष सावंत यांच्या प्रवासी टॅक्सीमध्ये एक प्रवासी बसला. पुढे जाऊन त्याने त्याचा आणखी एक मित्र येणार असल्याचे सांगत टॅक्सी रस्त्याकडेला थांबविण्याची विनंती केली. चालक सावंत विनंतीवरुन रस्त्याकडेला थांबले असता, प्रवाशाने त्यांच्यावर सुरी हल्ला केला.

यात टॅक्सी चालक सावंत यांच्या मानेवर डोक्यात आणि कपाळावर गंभीर जखम झाली आहे. कोलवाळ पोलिसांनी याप्रकरणी संशयित प्रवासी लेनी पीटर सीमॉईस याला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Taxi Driver Attacked In Goa
Licence Of assaulted Taxi Driver

अधिक भाडे मागणीवरुन झाला वाद?

टॅक्सी चालकाने प्रवाशाकडे अधिक भाडे मागितले त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला असा दावा यावेळी उपस्थित काही प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केला आहे. तर, अगाऊ पैशांची मागणी केलीच नाही, असे टॅक्सी चालकाने म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित हल्लेखोर प्रवाशाला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT