Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Aggregator Issue: ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रीगेटर प्रश्नाचे CM सावंत यांनी एका ओळीत मराठीतून दिले उत्तर; वाचा काय म्हणाले?

Goa CM On Taxi Aggregator Issue: नव्या नियमांनुसार, राज्यात अ‍ॅग्रीगेटर सेवा देणाऱ्या कंपन्यांना परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी उपस्थित केलेला वाहतूक संकलकाचा (ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रीगेटर) प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (११ जून) मंत्रालयात पत्रकारांना सांगितले.

पत्रकारांनी याविषयी अनेक प्रश्न विचारले असता त्यांनी एका ओळीत सरकार हा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवेल, असे नमूद केले. दरम्यान, पावसाळी अधिवेशन २२ जुलैपासून होईल, अशीही माहिती देण्यात आली. सरकारने राज्यात वाहतूक संकलक नेमण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करत नवीन नियमांचा मसुदा अधिसूचित केला आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक टॅक्सी व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, गोव्याच्या विविध भागांत आंदोलनाची धग उसळली आहे.

या नव्या नियमांनुसार, राज्यात अ‍ॅग्रीगेटर सेवा देणाऱ्या कंपन्यांना परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये सेवा दर, वाहनांची नोंदणी, ग्राहक तक्रार निवारण प्रणाली, डिजिटल व्यवहार, जीपीएस ट्रॅकिंगसारख्या अनेक अटींचा समावेश आहे. या मसुद्यावर व्यावसायिक तसेच नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून त्यासाठी ३० दिवसांची मुदत जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, या नव्या योजनेमुळे पारंपरिक टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर गदा येईल, अशी भीती व्यक्त करून त्यांनी गोव्यात विविध ठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. विशेषतः उत्तर गोव्यात पर्यटनप्रधान भागांमध्ये कळंगुट- बागा, साळगाव येथे तीव्र निषेध आंदोलन सुरू आहे.

समन्वय साधणार

- कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आंदोलक टॅक्सीचालकांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात समतोल भूमिका घेत सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.

- मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'सरकार कोणत्याही घटकाचे नुकसान होऊ देणार नाही. पारंपरिक टॅक्सीचालक आणि अ‍ॅग्रीगेटर सेवा या दोघांनाही सामावून घेणारा तोडगा निघेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT