St Inez Creek pollution in Goa Dainik Gomantak
गोवा

St Inez Creek Pollution: सांतिनेज खाडीच्या प्रदूषणाचा मुद्दा तापला! ताळगाव ग्रामसभेत मलनिस्सारणासह उघड्यावर शौचाचा प्रश्न गाजला

Mandovi River Pollution: सांतिनेज खाडीतील दूषित पाण्यामुळे मांडवी नदी दूषित होत असल्याचे कारण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सांतिनेज खाडीतील दूषित पाण्यामुळे मांडवी नदी दूषित होत असल्याचे कारण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे सांतिनेज खाडीचा आणि भूमिगत मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामाचा, तसेच किनाऱ्यावर उघड्यावर होणाऱ्या शौचाचा विषय आजच्या ताळगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रकर्षाने समोर मांडण्यात आला.

पंचायतीच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या बैठकीचे सरपंच मारिया फर्नांडिस यांनी अध्यक्षपद भूषविले. यावेळी उपसरपंच, सर्व पंचसदस्य आणि सचिव गौरेश पेडणेकर यांची उपस्थिती होती. ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालात मांडवी नदीच्या प्रदूषणाला कॅसिनोंना दोष दिला नाही, तर सांतिनेज खाडीला दोष दिला आहे.

उघड्यावर शौचास; पुरावेही दिले

आपण ओडशेल किनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसण्याच्या घटनेचे पुरावे देणारे व्हिडिओ पंचायत मंडळासमोर दिले. नदीकिनारी असलेल्या हॉटेल्सच्या पार्श्वभूमीवर, ही आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे, हे आपण पटवून दिले. परंतु या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी ग्रामसभेसमोर आपली थट्टा करण्यात आली. एका महिलेची सर्वांसमोर थट्टा केली जात असतानाही महिला सरपंच गप्प राहिल्याबाबत सिसील रॉड्रिगीस यांनी संताप व्यक्त केला. याविषयी रॉड्रिगीस यांनी समाजमाध्यमातून पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले आहे.

पंचायतीचे स्पष्टीकरण

ताळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत ज्या लोकांनी लेखी विषय पंचायतीकडे दिले होते, त्यावर चर्चा झाली. पंचायतीच्या ग्रामसभेविषयी जाहिरातही दिली होती, त्यामुळे कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु सिसील रॉड्रिगीस या ग्रामसभा संपताना आल्या. त्यांनी कोणताही विषय लेखी दिला नव्हता. तरीही त्यांनी मांडलेल्या उघड्यावर शौचाच्या विषयाची नोंद पंचायतीने करून घेतली आणि व्हिडिओ चित्रणही केले आहे. परंतु त्यांनी समाजमाध्यमातून पंचायतीवर जे आरोप केले आहेत, ते आम्ही फेटाळून लावत आहोत, असे पंचायत सदस्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mumbai Indians'ची नवी रणनीती! प्रशिक्षक बदलल्यानंतर आता कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची सुट्टी? रोहित शर्माच्या हाती पुन्हा संघाची कमान; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांची धडक; पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात, अनेक जण जखमी VIDEO

Querim Forest Hunting: केरीच्या जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढल्याचा संशय; वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर?

खरी कुजबुज: भाजपविरोधक साष्टीवर निर्भर?

Ishan Kishan Injury Update: टीम इंडियाला मोठा धक्का! तिसऱ्या टी-20 सामन्यातूनही ईशान किशन बाहेर; BCCI ने दिली दुखापतीबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT