Swachh Bharat Mission Dainik Gomantak
गोवा

Swachh Bharat Mission: स्वच्छतेच्या महायज्ञात गुंतले हजारो हात; मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार सहभागी

पावसातही उत्साह, ग्रामीण भागातून मोठा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

Swachh Bharat Mission केंद्र सरकारने केलेल्‍या आवाहनानुसार, 1 ऑक्‍टोबरला राज्‍यभरात स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले. पावसाचा जोर असला तरी अनेक घटकांनी हाती झाडू घेऊन आजूबाजूचा परिसर, समुद्र किनाऱ्यांवर जात स्‍वच्‍छतेसाठी योगदान दिले.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह अन्‍य मंत्र्यांनीही अभियानात सहभाग घेतला. शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांतून स्‍वच्‍छतेसाठी योगदान दिले. खासकरून ग्रामीण भागातून मोठा सहभाग दिसला.

मोदींचाही सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीरविवारी तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्याबरोबरच सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची असल्याचा संदेश दिला. त्यांनी आज देशव्यापी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

या मोहिमेअंतर्गत देशभरातील हजारो नागरिकांनी एक तास श्रमदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेला आवाहन करत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानात सहभागी होण्याची विनंती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

SCROLL FOR NEXT