Goa women safety Dainik Gomantak
गोवा

Crime Prevention in Goa: महिलांविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यात गोवा यशस्वी; राष्ट्रीय स्तरावर टक्केवारी अव्वल

Crimes against women in Goa: महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यात गोवा अव्वल आहे

Akshata Chhatre

Crime Against Women in Goa

पणजी: गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात गोवा यशस्वी झाला आहे. खास करून महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यात गोवा अव्वल आहे. पश्चिम विभाग परिषदेच्या २७ व्या बैठकीच्या अहवालानुसार वर्ष २०२४ मध्ये केवळ दोन महिन्यात तपास पूर्ण करण्यात गोव्याचे प्रमाण ९७.९४ टक्के आहे तर देशाची टक्केवारी ९३ टक्के आहे.

पश्चिम विभाग परिषदेच्या २७ व्या बैठकीत गोवा, दीव-दमण आणि दादर, नागरहवेली यासह गुजरात आणि महाराष्ट्र्र या राज्यांचा अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात संबंधित राज्यांमध्ये महिला आणि मुलांबरोबर घडणाऱ्या गुह्यांचा अहवाल मांडण्यात आला होता. गेल्या सात वर्षात गोवा दोन महिन्यात महिला आणि लहान मुलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास केवळ दोन महिन्यात करण्यात यशस्वी होत असल्याची माहिती गोव्याबद्दल सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आली आहे.

वर्ष २०१८ मध्ये हा आकडा ३९.३९ टक्के होता आणि त्यांनतर आकडेवारीत सकारात्मक बदल व्हायला सुरुवात झालीये . २०१९ मध्ये हा आकडा ६९.३५ टक्के, २०२० मध्ये ८७.२७ टक्के, २०२१ मध्ये ८५.७१ टक्के, २०२२ मध्ये ९२.३१ टक्के आणि २०२३ मध्ये १०० टक्के इतका होता. तर आता वर्ष २०२४ मध्ये ही टक्केवारी ९७.९४ टाक्यांवर जाऊन पोहोचली आहे.

गुन्ह्यांचा तपास केवळ दोन महिन्यात करण्यात इतर राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या तुलनेत गोवा अव्वल आहे. गोव्याशिवाय महाराष्ट्र ९५.३३ टक्क्यांसह तिसऱ्या आणि गुजरात ८६.७३ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय वर्षभरात तपास पूर्ण करण्यात गोवा दुसऱ्या स्थानकावर असून गोव्याची टक्केवारी ९१.४३ आहे. महाराष्ट्र ९१.६२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि गुजरात ८८.१४ टक्क्यांसह सर्वात तळाशी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT