Subhash Shirodkar: उत्तर गोव्यातील पेडणे व बार्देश तालुक्यांतून 47 सहकार सोसायट्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यामागची नेमकी कारणे स्पष्ट होण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले आहेत.
दिवाळखोरीत निघालेल्या संस्थेतील 35 बार्देश, तर उर्वरीत 12 पेडणे तालुक्यातील आहेत. यात विश्वासाने गुंतवणूक करणारे लोक हे सर्वसामान्यांतील आहेत. म्हापसा अर्बन किंवा मडगाव अर्बन बँक दिवाळखोरीत निघणे हा त्या शहरास लागलेला एक डाग.
त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकतात. त्या दूर करण्यासाठी दिवाळखोरीत निघण्यामागचे कारण शोधून काढले जाणार असल्याचे शिरोडकर म्हणाले. हा अहवाल 15 दिवसांत सादर केला जाईल, असेही ते म्हणाले.
70 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त बार्देशातील उपनिबंधकातर्फे शनिवारी (ता.१८) म्हापशात आयोजिलेल्या कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. व्यासपीठावर उपनिबंधक सीताराम सावळ, डॉ. अमृत नाईक, हरीष नाईक, म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ उपस्थित होत्या.
पेडणे व बार्देशमध्ये 1032 सहकार सोसायट्यांचा समावेश होतो. त्यातील 500 हून जास्त हाउसिंग क्षेत्रातील आहेत. हाउसिंग सोसायट्या या वादविवाद होणारे अड्डे आहेत. त्यांच्यातील वादाचे पडसाद सहकार निबंधकावर होतात.
एकूण सोसायट्यांतील 114 स्वयंसेवा संघटना आहेत. सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज शिरोडकर यांनी व्यक्त केली. प्रकाश धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.