Rajasthan: राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये एका 40 वर्षीय महिलेचे पहिले अपहरण करण्यात आले. नंतर तिच्यावर बस चालकाने बलात्कार केला आणि तिला बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. अशी माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली.
गुरुवारी महिलेचा शोध न लागल्याने महिलेचा पती हरमदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेला होता. परंतु अधिकाऱ्यांनी त्याला 24 तासांनंतर परत येण्यास सांगितले.
नंतर, पोलिसांना गुरुवारी मध्यरात्री ती महिला बेशुद्धावस्थेत सापडली. शुक्रवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांच्या निषेधानंतर, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी बस चालक राजेंद्र याला ताब्यात घेण्यात आले.
विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराने पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राज्यातील महिलांवरील अत्याचारांसाठी सत्ताधारी काँग्रेस सरकारला जबाबदार ठरवले आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, ती भाजी घेण्यासाठी गेली होती. आरोपीने तिचे अपहरण करून बलात्कार केला.
या प्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असून असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.
राजस्थानमधील दौसा येथे 10 नोव्हेंबर रोजी एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसोट परिसरात आरोपीने दुपारी मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. एएसपी रामचंद्र सिंह नेहरा यांनी सांगितले की, आरोपी भूपेंद्र सिंहला ताब्यात घेण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.