Goa: Margaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Goa: मडगावचे माजी नगरसेवक अडचणीत

Goa: अभ्यास दौऱ्यांची बिले ठरलेल्या कालावधीत सादर न केल्याने मडगावचे किमान ८ ते १० माजी नगरसेवक अडचणीत

Mahesh Karpe

मडगाव : २०१६, २०१७ व २०२० साली केलेल्या अभ्यास दौऱ्यांची (Study Tour Bills) बिले ठरलेल्या कालावधीत सादर न केल्याने मडगाव नगरपालिकेचे किमान ८ ते १० माजी नगरसेवक अडचणीत आलेले आहेत. त्यात एका ज्येष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. पालिका (Margaon, Goa) प्रशासन संचालकांनी त्यांना त्या संदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

पालिका प्रशासनाच्या मार्गदर्शक प्रणालीप्रमाणे दौऱ्यासाठी दिलेल्या निधीचा योग्य हिशेब संबंधितांनी सहा महिन्यांत सादर करायला हवा, पण अनेक वर्षे उलटली तरी तो सादर न केल्याने ही बाब पालिका प्रशासन संचालकांपर्यंत पोचली. त्यांनी त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी या महिना अखेरीस सुनावणी होणे अपेक्षित आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेला विज्ञान भवन नवी दिल्ली दौरा, नोव्हेंबर २०१७ मधील अजमेर-राजस्‍थान दौरा व हल्लीचा म्हणजेच २०२० मधील माऊंट अबू-राजस्‍थान दौरा असे हे अभ्यास दौरे आहेत. त्यासाठी लाखो रुपये मंजूर केले गेले. सर्व नगरसेवकांनी त्याबाबतची बिले सहा महिन्यांत सादर करणे अपेक्षित होते.

दौऱ्यांवर लाखोंचा खर्च

२०२० मध्ये तत्‍कालीन ६ नगरसेवक माऊंट अबूला गेले. ते अमृत योजनेखालील हरितपट्टे व उद्याने यांच्या विकासाच्या प्रशिक्षण तथा अभ्यास दौऱ्यावर ते गेले होते. त्यासाठी १.२१ लाख रुपये निवासावर, १.२ लाख रुपये विमान प्रवास व रु. २४०० प्रशिक्षणाची नोंदणी अशी रक्कम मंजूर झाली होती. पण, नगरसेवकांनी प्रवास भत्ता बिले देखील सादर केली नाहीत. त्या पूर्वी २०१७ मध्ये १० माजी नगरसेवक अजमेरला घनकचरा व्यवस्थापनावरील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना २.७२ लाख रुपये सुपूर्द केले गेले होते, पण त्याचीही बिले त्यांनी सादर केली नाहीत. नंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना त्याबाबत नोटिसा दिल्या. तरीही त्यांनी त्याची दखल घेतली नही. तर काहींनी पालिकेच्या लेखा विभागात सादर केलेली बिले निर्धारीत नमुन्याबरहुकूम नव्हती.

...तरीही नगरसेवक गेले दौऱ्यावर

वास्तविक २०२० मध्ये माऊंट अबू दौऱ्यावर विविध थरांतून टीका झाल्यावर तत्कालीन नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी तो दौरा रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु, सहा नगरसेवक एका अभियंत्याला घेऊन त्या दौऱ्यावर गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT