lathicharge Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करावी असा आदेश गोवा राज्य मानवाधिकारी आयोगाने दिले आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी: आल्तिनो - पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यासाठी जाणाऱ्या एनएसयूआय

विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करावी असा आदेश गोवा राज्य मानवाधिकारी आयोगाने दिले आहेत. या घटनेची उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून त्याचा अहवाल 2 मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या संख्येमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याऐवजी त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात

या मागणीसाठी एनएसयूआयच्या शिष्टमंडळाने पणजीत मोर्चा काढला होता. हा मोर्चा पणजीतील चर्च चौकाकडून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने शांततेने निघाला असता तो तेथील जंक्शननंतर रस्त्यावर अडविण्यात आला. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाला परवानगी देण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र, फेटाळून लावण्यात आली होती. या विद्यार्थ्यांचा मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून दहशत निर्माण केली

या लाठीचार्ज घटनेनंतर एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी गोवा राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. शांततेने काढण्यात आलेला हा मोर्चा पोलिसांनी कोणतेही कारण न देता बेरिकेडस् घालून अडविला तसेच मोर्चात सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांवर बेछुट लाठीचार्ज करण्यात आला. तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पणजीच्या काही पोलिस कॉन्स्टेबल्स व हवालदारांनी लाठीचार्ज करत पोलिस बसमध्ये जबरदस्तीने ढकलून कोंबले. काही विद्यार्थ्यांना निमूटपणे बसमध्ये प्रवेश करत असताना लाठीने मारहाण केल्याचे तक्रारीत चौधरी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

SCROLL FOR NEXT