Goa Accident's Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघातातील विद्यार्थ्याचे अखेर निधन

आगोंद येथे हळहळ: आज अंत्यसंस्कार

दैनिक गोमन्तक

आगोंद: चार दिवसांपासून मडगाव येथील खासगी इस्पितळात मृत्यूशी झुंज देणाऱ्या आगोंद-काणकोण येथील शेनोय फर्नांडिस या बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सोमवारी उपचार सुरू असताना निधन झाले. मंगळवारी 19 रोजी आगोंद येथील सेंट एनिस चर्चच्या दफनभूमीत दुपारी अडीच वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याबाबत माहिती अशी की, चाररस्ता श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी इयत्तेत शेनोय फर्नांडिस शिकत होता. लोलये येथील आपल्या आत्याकडून निरोप घेऊन एका मित्रासमवेत स्वत:च्या घरी बुधवारी 13 रोजी तिन्हीसांजेला परतत असताना दुचाकीला अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर मडगाव इस्पितळात उपचार सुरू होते. मित्राला किरकोळ मार लागला होता.

त्याच्या अकाली जाण्यामुळे आगोंदर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई - सेल्फा, वडील - केजी, लहान दोन भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT