IIT Campus Goa Dainik Gomantak
गोवा

IIT Goa: गोव्यात आयआयटी जागेची शोधमोहीम अजूनही संपेना!!

IIT Campus Goa: गोव्यातील आयआयटी कॅम्पसचा प्रकल्प अजूनही सुरु होण्याचे नाव घेत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: गोव्यातील आयआयटी कॅम्पसचा प्रकल्प अजूनही सुरु होण्याचे नाव घेत नाहीये. जमिनीच्या मालकी हक्काच्या समस्येमुळे सांगे तालुक्यातील रिवण या गावात सुरु होणारा प्रकल्प रखडला आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने प्रस्तावाला मंजुरी देऊन देखील काही कागदपत्रांच्या अभावी आणि दस्तऐवज समस्यांमुळे 10.5 लाख चौरस मीटर जागेवर IIT गोवा कॅम्पस उभा राहू शकला नाही आणि अजूनही नवीन जागेचा शोध सुरूच आहे.

शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या मते, सरकार आयआयटी गोवा कॅम्पससाठी नवीनपर्यायी पर्याय शोधत आहे. "आम्ही इतर पर्यायांचा शोध घेत आहोत," असे म्हणत त्यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली मात्र संदर्भात अधिक तपशील सादर केले नाहीत. सांग्याचे आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांचा रिवण येथील जागा सुचवण्यात मोठा वाटा होता मात्र अद्याप त्यांनी यावर काही भाष्य केलेले नाही.

गोव्यातील फर्मागुडी फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटीचे तात्पुरते कामकाज सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकार आयआयटी कॅम्पससाठी जागेच्या शोधत आहे आणि योग्य जागा शोधण्यात उशीर झाल्यामुळे संस्थेची वाढ आणि विकासाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

गोव्यात आयआयटी कॅम्पससाठी जागा शोधणं हीच सरकारसाठी परीक्षा ठरत आहे. कधी या जमिनीला केंद्रातून मान्यता मिळत नाही तर अनेकवेळा स्थानिकांच्या नाराजीमुळे हा प्रकल्प मागे घ्यावा लागतो. यापूर्वी काणकोण आणि सत्तरीमधून देखील स्थानिकांची सहमती नसल्याने हा प्रकल्प हलवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT