Sal river Joining wastewater. Dainik Gomantak
गोवा

Margao News : राज्यातील 75 पाणथळे सांडपाण्‍यामुळे प्रदूषित!

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, पाणथळ जागेच्‍या काठावर वाढलेली लोकवस्‍ती आणि व्‍यावसायिक आस्‍थापने यामुळे गोव्‍यातील विविध पाणथळ ठिकाणे झपाट्याने प्रदू्षित होऊ लागली असून जलस्रोत खात्‍याने तयार केलेल्‍या यादीत संपूर्ण गोव्‍यात असे ७५ जलस्राेत जागा प्रदुषणाच्‍या गर्तेत सापडल्‍याचे दिसून आले आहे.

या पाण्‍यात मानवी विष्‍टेची दरराेज भर पडत असल्‍याने त्‍यातील ई कोलाय या घातक बॅक्‍टेरियाचे प्रमाण वाढत असून हे पाणी विषबाधेचे कारण ठरू शकते असा धोक्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.

गोव्‍यातील सर्वांत दाट लोकवस्‍तीचा तालुका असलेल्‍या सासष्‍टी तालुक्‍यात सर्वांत जास्‍त म्‍हणजे २९ प्रदूषित जलस्‍थळे सापडली असून त्‍या पाठोपाठ डिचाेलीत १६, तर फाेंड्यात १२ पाणथळ ठिकाणे प्रदुषित झालेली आहेत. मुरगाव येथे सात, केपे व बार्देश तालुक्‍यात प्रत्‍येकी चार, तर काणकोण, पेडणे व सत्तरी या तालुक्‍यात प्रत्‍येकी एक पाणथळ जागा प्रदुषणाच्‍या गर्तेत सापडल्‍या आहेत.

साळ नदीचे अस्‍तित्‍व धाेक्‍यात

सासष्‍टीत साळ नदीसह नावेलीचे सायपे तळे प्रदूषणाच्‍या गर्तेत सापडले असून याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, कित्‍येक नाल्‍यातून सोडलेले सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता या नदीत जात आहे. त्‍यामुळे संपूर्ण सासष्‍टी तालुक्‍याची जीवनदायिनी असलेल्‍या साळ नदीचे अस्‍तित्‍व धाेक्‍यात आले आहे.

अनेक ठिकाणचे जलसाठे प्रदूषित

काही पर्यटकांना आकर्षित करणारे जलसाठेही प्रदुषित झाले असून त्‍यात हरमल येथील जगप्रसिद्ध अशा ‘स्‍वीट वॉटर लेक’ या तळ्‍याचा समावेश आहे.

यातील काही तळ्यांची सफाई सरकारने हाती घेतली असून त्‍यात प्रसिद्ध अशा करमळी तळ्‍यासह वास्‍को येथील मायमोळे तळे, सासष्‍टीतील सायपे तळे यासह बेती, पिळर्ण, सुर्लाभाट, मळा आणि मिरामार येथील तळ्‍यांचा समावेश आहे.

प्रदूषिततेच्या गर्तेतील जलसाठे

सासष्‍टी 29

डिचाेलीत १६

फाेंड्यात १२

मुरगाव ७

केपे ४

बार्देश ४

काणकोण १

पेडणे १

सत्तरी १

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT