Discussion Waste Entrepreneurs Dainik Gomantak
गोवा

Pollution Control Board: गोव्याची परिसंस्था निर्माण करण्याची क्षमता कचरा उद्योजकांमध्ये; मात्र आव्हाने समजून घेण्याची गरज

State Pollution Control Board: या क्षेत्रातील धोके बहुगूणीत आहेत. सध्याची धोरणे असंघटित क्षेत्रात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांच्या भूमिकेला संबोधित करत नाहीत.

Ganeshprasad Gogate

State Pollution Control Board: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेत मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवा आणि संपुर्ण(अ)र्थ इन्व्हरमेंट सोल्युशन्स यांनी संघटित आणि असंघटित कचरा उद्योजकांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करणाऱ्या परिषदेचे आयोजन केले.

संघटित आणि असंघटित कचरा उद्योजकांमधील धोरणीय अंतराबाबत चर्चा करणारी ही परिषद होती. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत कचरा व्यावसायिकांमुळे कचऱ्याचा प्रश्न 92 टक्केइतके मार्गी लागतो, यामध्ये दररोज निर्माण होणाऱ्या 25000 टन प्लास्टिकचा समावेश आहे.

संपुर्ण(अ)र्थ इन्व्हरमेंट सोल्युशन्सचे संचालक देबार्था बॅनर्जी म्हणाले, धोरण निर्माते आणि औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना असंघटित कचरा व्यावसायिकांची आव्हाने समजून घेण्याची गरज आहे.

यामध्ये व्यावसायिक परवाना, आरोग्य आणि सुरक्षा, कचरा कामगारांचे प्रश्न आणि रिसायकलिंगचा व्यवसायबाबतच्या गोष्टींचा समावेश असून यासारख्या समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

अधिक विचार करता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच कचऱ्याच्या साखळीतील समस्या आणि व्यवहार्यतासारख्या गोष्टींची पक्की समज आहे.

असंघटित क्षेत्रातील आव्हाने समजून घेण्याच्या उद्देशाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की लहान, मोठ्या आणि मध्यम स्वरूपात 800 हून अधिक असंघटित आणि संघटित कचरा व्यावसायिक आहेत.

लहान स्वरूपात रिसायकलिंग करणारे व्यावसायिक, कचरा विक्रेते आणि खरीदीदार यासारख्या कामांमध्ये हजारो लोकांच्या हातांना काम मिळते. तसेच फेरीवाले आणि कचरा वेचकांची संख्या तीन ते पाच हजारांच्या घरात आहे.

या परिषदेमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. या क्षेत्रातील धोके बहुगूणीत आहेत. सध्याची धोरणे असंघटित क्षेत्रात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांच्या भूमिकेला संबोधित करत नाहीत.

उच्च सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असमानता असलेल्या क्षेत्रात सार्वजनिक सेवा पार पाडण्यासाठी असंघटित क्षेत्र आरोग्याबाबतची अविश्वसनीय जोखीम स्वीकारते. ज्यामुळे सामाजिक पातळीवर अनेक पर्यावरणविषयक प्रश्न मार्गी लागतात.

मिनरल फाउंडेशन ऑफ गोवाचे प्रकल्प व्यवस्थापक पराग रांगणेकर म्हणाले, “याबाबत आंतर-विभागीय सहकार्याची गरज आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायती, बल्क वेस्ट जनरेटर, सेवा प्रदाते यांच्यात प्रक्रिया आणि कार्यपद्धती अद्याप लागू होणे बाकी आहे.

कचरा पुरवठा साखळीतील या महत्त्वाच्या भागधारकांच्या बरोबरीने काम करण्यासाठी तंत्रज्ञानीय नवकल्पनासुद्धा आवश्यक आहे.

शाश्वत उपाय अंमलात आणण्याच्या दृष्टीने अतिसूक्ष्म वास्तविकता समजून घेण्यासाठी सखोल शोध घेत कचरा व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण भूमिका समोर येत आहेत.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर आणि सस्टेनेबिलिटीच्या प्रमुख गायत्री दिवेचा म्हणाल्या, “मोठ्या जबाबदाऱ्या आणि कचरा व्यवस्थापन उद्योगात योगदान देऊनही, कचरा कामगारांचे प्रयत्न दुर्लक्षित राहतात.

बहुतेक असंघटित कचरा कामगार मागास समजल्या जाणाऱ्या जातींतील असतात, ते बहुतेक वेळा स्थलांतरित असतात आणि वस्त्यांमध्ये राहतात.

त्यांच्या श्रमाला सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांची आंतरपिढीतील दारिद्र्य, व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव आणि सरकारी ओळखपत्रांचा अभाव, जे त्यांना औपचारिक रोजगार आणि सरकारी हक्कांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते, यासाठी धोरण निर्मात्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

त्यांची भूमिका महत्त्वाची आहे कारण ते एक स्वच्छ आणि निरोगी गोव्याची परिसंस्था निर्माण करू शकतात. विस्तारित उत्पादक उत्तरदायित्व विकसित करणे आवश्यक आहे आणि या क्षेत्रासाठी शिक्षण आणि क्षमता बांधणीवर देखील लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

संपूर्ण अर्थ, मिनरल फाऊंडेशन ऑफ गोवा, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी एकत्र आणलेली कचरा व्यवस्थापन समस्या आणि उपाय या विषयावरील ही दुसरी परिषद आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उत्तर गोव्यातील पिळर्ण येथील कार्यालयात ही परिषद आयोजित केली आहे.

परिषदेत बोलताना, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले, “गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळासह गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कार्यरत आहे.

असंघटित कचरा व्यावसायिकांना संघटित व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे.

संघटित क्षेत्रातील वायसायिकांशी चर्चा करून त्यांना सहभागी करून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आमचे ब्रीदवाक्य फक्त एक नियामक असे नसून सुविधाजनक असे आहे.

यासाठी आम्हाला संपूर्ण (ई) अर्थ, गोदरेज इंडस्ट्रीज आणि मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा तसेच कचरा व्यवस्थापन समुदायाकडून उत्कृष्ट पाठिंबा मिळाला आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT