Milind Patil Dainik Gomantak
गोवा

Goa Milind Patil:IT तील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारुन बनला यशस्वी पर्यटन व्यावसायिक, मयेच्या मिलिंद पाटीलची प्रेरणादायी कहाणी

पुण्यात असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो गोव्यात आला आणि पर्यटन व्यवसायातून लाखभर रुपये कमवले.

Vinayak Samant

क्वचित कुणीतरी एखादी अशी व्यक्ति सापडेल जी स्वतःची असणारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचे धाडस करेल. डिचोली तालुक्यातील मये गावातील मिलिंद मारुती पाटील ह्याने असेच एक धाडस केले आणि त्यात तो यशस्वी देखील झाला.

आजकाल शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्वांनाच सरकारी नोकरी महत्वाची वाटते आणि ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ही करतात. किंवा एखाद्या खाजगी कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगारची नोकरी मिळावी म्हणून विविध कंपन्यांचा पायऱ्या झिजवत असतात.

मये येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मिलिंद सध्या किनारी भागात स्वतःचा टुर्स अँड ट्रेवल्स चा व्यवसाय चलवितो. त्याने एका टॅक्सी पासून सुरुवात केलेल्या ह्या व्यवसायात गेल्या ७ वर्षात जवळपास १० टॅक्सी आहेत.

मिलिंद कुटुंबात सर्वात मोठा. वडील शिक्षक होते त्यामुळे घरात कडक शिस्त. लहान असल्यापासूनच शिक्षणात हुशार असलेल्या मिलिंद ला २००२ साली आयटी चे शिक्षण पूर्ण झाल्यावर वेर्णा औद्योगिक वसाहतीत एक मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लागली.

तिथे चार वर्षे नोकरी करीत असतानाच पुण्याला जाऊन इंटरनेट हॅकिंग रोखण्यासाठी असलेल्या CEH ह्या अमेरिकन सरकारमान्य कोर्स चे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी हा कोर्स गोव्यात उपलब्ध नसल्याने त्याला पुण्याला जावे लागले.

त्यानंतर पुण्यातच एका मल्टी नॅशनल बँकेत सिस्टम एडमिन आणि नेटवर्क सपोर्ट देण्याचे काम करायला त्याने सुरवात केली. ही बँक आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असल्याने सिंगापूर, फिलिपिन्स सारख्या देशात नेटवर्किंग प्रॉब्लेम्स सोडविण्याचे काम मिलिंद करायचा.

पुण्यात असलेली ६० हजार एवढी गलेलठ्ठ पगाराची नोकरी काही आरोग्याच्या तक्रारीमुळे त्याला सोडावी लागली. आता जे काही करीन ते गोव्यातच असे ठरवून तो गोव्यात आला आणि एका नामांकित मोबाइल कंपनीमध्ये संपूर्ण गोवा प्रभागाचा सेल्स हेड पदावर मोठ्या पगारात रुजू झाला.

त्यावेळी गोव्यामध्ये आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी वाव नव्हता. लोकांना त्याबद्दल माहिती देखील नव्हती. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळत नसल्याने मिलिंद ने असलेली मोठ्या पगारची नोकरी सोडून शेवटी व्यवसायात उतरण्याचे ठरविले.

गोव्यामध्ये २०१२ साली खाण व्यवसाय बंद झाला आणि राज्याची सर्व मदार पर्यटन व्यवसायावर आली. या व्यवसायात असलेली संधी पाहून मिलिंद ने टुर्स अँड ट्रेवल्स चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्याचा या निर्णयाला कुटुंबियांनी पूर्ण पाठिंबा दिला.

२०१६ साली एक टॅक्सी घेऊन ‘सोहम टुर्स अँड ट्रेवल्स’ ची सुरवात केली. किनारी भागात पर्यटकांना फिरविताना त्याचा लक्षात आले की त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नाही. त्यामुळे त्याने पर्यटकांसाठी गाईड बनून वेगळा गोवा दाखवायला सुरवात केली.

अतिशय हुशार, सौम्य बोलणं, प्रेमळ स्वभाव यामुळे पर्यटकांवर त्याची छाप पडू लागली. वाढता प्रतिसाद पाहून त्याने स्वतःचा व्यवसाय देखील वाढविला आणि आता त्याचाजवळ १० टॅक्सी असून दर महिना लाखभराचा फायदा त्याचा व्यवसायात होतो.

“ज्या दिवशी आपण पहिल्यांदा नोकरीसाठी घराबाहेर पडलो तेव्हापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या पण आयुष्यात एकही दिवस आपण बेरोजगार नाही उरलो. पर्यटन व्यवसायात आत्ता स्पर्धा खूप वाढली आहे. ज्यांना ह्या व्यवसायात येण्याची इच्छा आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय ट्रेवल एजेंट किंवा टुरिस्ट गाईड म्हणून काम कारावे. आपण जेव्हा या व्यवसायात आलो तेव्हा इंधनाची किंमत कमी होती. आता महागाई वाढली असून गाडीचं भाडं तेवढेच असल्याने ह्या व्यवसायात टिकून उरणे काठीण झाले आहे.”
मिलिंद पाटील, सोहम टुर्स अँड ट्रेवल्स, मालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT