Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

Goa State Government: राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना वीज बचतीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी कोणती उपाययोजना केली जावी, याची नियमांची सविस्तर माहिती या आदेशात दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्य सरकारने सरकारी कार्यालयांना वीज बचतीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी कोणती उपाययोजना केली जावी, याची नियमांची सविस्तर माहिती या आदेशात दिली आहे. या नियमांचे पालन केले नाही तर वीज विभाग योग्य नोटीसीनंतर वीज कनेक्शन कापणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. या आदेशांना राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची मान्यता असून ते तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

राज्यातील ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वीजखात्याने उर्जा संरक्षण कायदा, २००१ अंतर्गत नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सरकारी आणि खासगी क्षेत्रात ऊर्जा वापर कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी विविध सुधारणा लागू केल्या जातील. गोवा सरकारने राज्यातील विविध क्षेत्रांत ऊर्जा प्रभावी प्रकाश आणि वातानुकूलन प्रणालींचा वापर अनिवार्य करणारा नवा आदेश जारी केला आहे. वीज खप कमी करण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी केला आहे.

एलईडी दिवे आणि बीएलडीसी पंखे अनिवार्य:

राज्यातील सर्व नवीन शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक क्षेत्रातील इमारतींमध्ये एलईडी दिवे आणि ऊर्जा कार्यक्षम बीएलडीसी पंख्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पारंपरिक दिव्यांऐवजी एलईडी दिवे बसवण्याचे निर्देश दिले आहेत.

सुधारित एसी प्रणाली:

राज्यातील सर्व नवीन शासकीय आणि खासगी इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम पाच स्टार रेटेड एअर कंडिशनिंग युनिट्स अनिवार्य केले आहेत. जुन्या इमारतींतही एसी युनिट बदलण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Allu Arjun: गोव्यात खरंच दारु खरेदी केली का? सात वर्षानंतर सुपरस्टार अल्लु अर्जुनने सांगितले Viral Video मागील सत्य

Global Konkani Forum: दत्ता नायकांच्‍या प्रस्‍तावाला उदय भेंब्रे यांचा विरोध का? ग्‍लोबल कोकणी फोरमने घेतला समाचार

Cash For Job Scam: 'पूजा 420' प्रकरणाला अंतच नाहीच!! पणजीमधल्या महिलेची 6 लाखांची फसवणूक

Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून गोवा-भोपाळदरम्‍यान थेट विमानसेवा, पर्यटनाला मिळणार चालना!

Goa Live Updates: पुन्हा धर्मांतरण खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT