Ramdev Baba In Goa Dainik Gomantak
गोवा

Ramdev Baba In Goa: गोव्यात साकारणार योगभूमी; राज्य सरकार-पतंजलीत करार

राजधानी पणजी येथे स्वामी रामदेव यांचे तीन दिवसीय योग शिबिरासह विविध कार्यक्रमांमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Ramdev Baba In Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पतंजली आयुर्वेद हरिद्वारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्यात काल एक बैठक झाली. यावेळी गोव्यातील योगभूमीच्या विकासासाठी सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा शोध घेण्यावर चर्चा झाली.

कृषी, फुलशेती, फलोत्पादन, मत्स्यपालन, सेंद्रिय शेती, ग्रामीण विकास, कृषी-पर्यावरण कल्याण पर्यटन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रांत संभाव्य सहकार्यासाठी सरकार व पतंजली आयुर्वेद यांच्यात सामंजस्य करार झाला.

दरम्यान, राजधानी पणजी येथे स्वामी रामदेव यांचे तीन दिवसीय योग शिबिरासह विविध कार्यक्रमांमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.

त्याच अनुषंगाने काल ताळगाव पठारावरील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम येथे पंतजली योगपीठ आणि शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्वामी रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विद्यार्थी, शिक्षकांसाठी योगासन प्रात्याक्षिक शिबीर घेण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व इतर मान्यवर उपस्थित होते. ‘गोव्याला योगभूमी बनविण्यासाठी रोगमुक्त आणि योगयुक्त गोवा बनविण्यासाठी प्रत्येकाने किमान अर्धातास योग करावा.

विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच मुल्याधिष्ठीत आणि गुणात्मक शिक्षणाच्या अनुषंगाने योग आवश्‍यक’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

..अन् मुख्यमंत्र्यांचा यू टर्न

योगासन प्रात्याक्षिक कार्यक्रमाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून योग अभ्यास सर्व शाळांना अनिवार्य करणार आणि जात-धर्म याचा भेदभाव न करता लागू करणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र, काही वेळाने माध्यमांशी संवाद साधताना याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री म्हणाले, की योग हा प्रकार शाळेत अनिवार्य करू शकत नाही. ज्याप्रमाणे शारीरिक शिक्षणाचा तास असतो, त्याचप्रमाणे शाळांनी इच्छेनुसार योग करावा, असे त्यांनी सांगितले.

...यासाठी शाळाप्रमुखांशी बोलणार : आपल्या भाषेसोबत सनातन संस्कृती, भारतीय संस्कृती अंगिकृत करण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळ आवश्‍यक आहे. शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात प्राचीन विद्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवाद आणि आध्यात्मवादाला सोबत घेऊन पुढे गेल्यास विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होईल. ही पद्धत अंमलात आणण्यासाठी राज्यातील विद्यालयांच्या प्रमुखांशी आपण चर्चा करू, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक सुदृढता तसेच गोव्याच्या रोगमुक्त आरोग्यासाठी योग गरजेचा आहे. त्यासाठी शिक्षकांनी योगाचे महत्त्व समजून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे द्यावे.

राज्यात १ हजारांहून अधिक पतंजलीचे प्रशिक्षित योग शिक्षक आहेत. त्यांना संपर्क साधल्यास विद्यालयात येऊन ते विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतील. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी शाळेत प्रार्थना करताना, शारिरीक शिक्षणाच्या तासावेळी योगालाही वेळ द्यावा. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत कुतुहल निर्माण करावे.

योगासनांमुळे विद्यार्थी सुदृढ होतात. त्यांची स्मरणशक्ती वाढते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किमान काही काळ योगसाधनेसाठी द्यावे. - स्वामी रामदेव, योगगुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT