Jaayanchi Pooja Dainik Gomantak
गोवा

Goa Mhardol : जाईच्या लाखो फुलांची अनोखी पूजा... पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा.

Vinayak Samant

Goa Mhardol : म्हार्दोळ च्या श्री देवी महालसा नारायणीचे मंदिर पुर्वी वेर्णा पठारावर होते. १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी देवालयांची मोडतोड सुरू केली म्हणून तिथल्या भाविकांनी देवीची मूर्ती म्हार्दोळ गावात आणली. तेव्हापासून हे मंदिर इथे उभे आहे.

म्हार्दोळ म्हटलं की आठवण होते ती वैशिष्ट्यपूर्ण अशा जाईंच्या फुलांची आणि तिथल्या महालसा नारायणी देवस्थानात होणाऱ्या ‘जाईंच्या पूजे’ ची. भाद्रपद वद्य द्वितीयेला तिथला नाईक गावकर हा फुलविक्रेत्यांच्या 'फुलकार' समाज ही पूजा करतो. राज्यासह बाहेरील गावातून मोठ्या संखेने भाविक या पूजेला हजेरी लावतात.

१९१४ मध्ये या जाईंच्या पूजेला सुरवात झाली. त्याकाळी एका दुर्धर रोगामुळे गावतील अनेक लोक आजारी पडले होते तर काहींनी जीवही गमावला होता. गावावर आलेल्या अरिष्टापासून सर्वांची सुटका कर असे गाऱ्हाणे फुलकार समाजाच्या लोकांनी देवी महालसेला घातले आणि तेव्हापासून ही पूजेची प्रथा चालू झाली.

म्हार्दोळ मधील फुलकार समाज हा आधी कलाकार म्हणून ओळखला जायचा. राज्यातील मोठ्या उत्सवांसाठी लागणारे हार तुरे इथेच तयार केले जायचे. देवी महालसेच्या कृपादृष्टिमुळे रोगराईपासून सुटका मिळालेल्या गावकऱ्यांनी देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे ठरविले. त्यामुळे आपली कला वापरुन विविध आकाराची मखर बनविण्याची संकल्पना समोर आली.

जाईंची पूजा जवळ आली की सुरवातीचे दोन दिवस बाजारात कुठेच जाई विकल्या जात नाही. त्या सर्व जाई फक्त देवीच्या चरणी वाहण्यासाठी जपून ठेवल्या जातात. आपली कला दाखवण्याचा उद्दिष्टाने आजही इथला फुलकार समाज जाईंचे मखर बनवितो.

मंदिराचा संपुर्ण परिसर ह्या जाईंच्या सुगंधाने दरवळलेला असतो. म्हार्दोळ गावात मिळणाऱ्या जाईंचा सुगंध राज्यात इतर कुठल्याही भागात सापडणाऱ्या जाईंपेक्षा वेगळा आणि जास्त प्रमाणात असतो. या पूजेला बनविले जाणारे जाईंचे मखर हे मुख्य आकर्षण असते.

१०० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ह्या पूजेला श्री देवी महालसेच्या चरणी विमानवाहन, महारथ, नौकावाहन, गरुडवाहन अशाप्रकारची जाईंनी सजविलेली विविध मखरे या नाईक गावकर समाजातर्फे अर्पण करण्यात आली आहेत.

पूजेच्या आदल्या दिवशी देवस्थान परिसरात मखर बनविण्याची प्रक्रिया सुरु होते. रात्रभर जागून जाईच्या फुलांनी सजविलेले मखर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यन्त पूर्णत्वास येते. खासकरून ही जाईंची केलेली कलाकृति बघण्यासाठीच लोक भेट देतात.

संध्याकाळी साधारण ७ वाजता या पूजेला प्रारंभ होतो आणि मग कथावाचन असते. ते झाल्यावर नाईक गावकर समाजातर्फे सांस्कृतिक गायन - भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. रात्री ११ ते १२ च्या दरम्यान गोव्यातील पारंपरिक घुमटांवर देवीची आरती होते. त्यानानंतर तीर्थप्रासादाने या पूजेची संगता होते. यावेळी देवीची गाभाऱ्यापासून ते संपुर्ण देवस्थान सभामंडपा पर्यन्त जाईच्या फुलांची सजावट केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT