Goa SSC Recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Recruitment: गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत भरती, सहाय्यक शिक्षकांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Goa SSC Recruitment: आयोगामार्फत इंग्रजी, हिंदी, कोंकणी, मराठी, संस्कृत, गणित, विज्ञान अशा एकूण 33 सहाय्यक शिक्षकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Pramod Yadav

Goa SSC Recruitment

गोवा कर्मचारी भरती आयोगामार्फत ग्रुप सी मधील विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने 33 सहाय्यक शिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्घ केलीय. 31 मार्चपर्यंत पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

गोवा नोकर भरती आयोगामार्फत 2024 सालातल्या दुसऱ्या नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्घ केलीय. यात इंग्रजी, हिंदी, कोंकणी, मराठी, संस्कृत, गणित, विज्ञान अशा एकूण 33 सहाय्यक शिक्षकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कोणत्या विषयासाठी किती पदे?

इंग्रजी - 06 पदे

हिंदी - 02 पदे

कोकणी - 01 पद

मराठी - 02 पदे

संस्कृत - 01 पद

गणित - 10 पदे

विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) - 06 पदे

सामाजिक शास्त्र (इतिहास/ नागरिकशास्त्र) - 03 पदे

सामाजिक शास्त्र (भूगोल/ अर्थशास्त्र) - 02 पदे

सर्व 33 पदांपैकी 13 जागा एसटी, 19 ओबीसी, 01 खुला प्रवर्ग आणि एक जागा दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

सर्व पदांसाठी उमेदवाराला मराठी आणि कोकणीचे ज्ञान आवश्यक आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार असून, यासाठी 45 वयोमर्यादा आहे.

पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवाराला gssc.goa.gov.in या संकेतस्थला थेट देता येईल. अर्जासाठी खुला प्रवर्गातील उमेदवाराला 400, एससी/ एसटी उमेदवाराला 100, ओबीसी उमेदवाराला 200, दिव्यांग उमेदवाराला 100 आणि ईडब्ल्युएस प्रवर्गातील उमेदवाराला 200 रुपटे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

सर्व पदांसाठी 80 मार्कांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 45 टक्के, एससी/ एसटी 35 टक्के आणि ओबीसी व दिव्यांग उमेदवाराला 40 टक्के मार्क मिळवणे आवश्यक असणार आहे. कोकणी भाषेत चार मार्क मिळवणाऱ्या उमेदवाराचाच पुढे विचार केला जाणार असल्याचे आयोगाच्या जाहिरातीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT