President Dainik Gomantak
गोवा

धनगर समाजाचाही एसटी मध्ये समावेश करा- धनगर समाज अध्यक्षांचे राष्ट्रपतींना साकडे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निवेदन सादर

गोमन्तक डिजिटल टीम

पारंपरिक भाषेत राष्ट्रपतींशी संवादगोवा भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अखिल गोवा धनगर समाजाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी समाजाच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची विनंती केली.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते. धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपतींना देण्यात आले.

कवळेकर यांनी धनगर समाजाची कैफियत राष्ट्रपतींसमोर मांडली. गावडा, कुणबी, वेळीप व धनगर (गाकुवेध) यापैकी धनगर वगळता इतर तिन्ही समाजाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने २००३ मध्ये एसटीचा दर्जा दिला.

धनगर समाज हा अजूनही बकऱ्या व गुरांचे पालन करून आपला उदरनिर्वाह करतो. गावडा, कुणबी, वेळीप समाजासोबत धनगर समाजालाही एसटी दर्जा मिळायला हवा होता. या तिन्ही समाजांचीही तशीच भावना आहे, असे कवळेकर यांनी राष्ट्रपतींना सांगितले.

विधानसभा अधिवेशनात ठराव

धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा असा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे, विधानसभा अधिवेशनातही अशी मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका जारी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, विधानसभा अधिवेशनातील ठराव व श्वेतपत्रिका भारतीय महानिबंधकांना पाठवली आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडलेला आहे.

या विषयाची आवश्यक ती सर्व माहिती देऊन भारतीय महानिबंधकांच्या शंकाही दूर करण्यात आल्या आहेत, असे कवळेकर यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले व या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली.

पारंपरिक भाषेत राष्ट्रपतींशी संवाद

अखिल गोवा धनगर समाजाचे सचिव दीपक लांबोर व पारंपरिक पेहरावातील चार पुरुष व चार महिला धनगरांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळातील ज्येष्ठ सदस्याने राष्ट्रपतींकडे धनगर समाजाच्या पारंपरिक भाषेत संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT