Mission Political Reservation For ST Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री सावंत यांनी माफी मागावी...

मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एसटीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

Akshay Nirmale

ST Political Reservation: केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी गोव्यातील एसटी समुदायाला विधानसभेत राजकीय आरक्षण मिळू शकत नाही, असे वक्तव्य केले. त्यावरून आता राज्यात राजकारण तापू लागले आहे.

आमदार विजय सरदेसाईंनंतर आता मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्जच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

आठवलेंच्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मंत्री रामदास आठवले आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच राज्य भाजपने याबाबत माफी मागावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्जचे जनरल सेक्रेटरी रूपेश वेळीप म्हणाले की, एसटी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री आठवले, मुख्यमंत्री सावंत आणि भाजपने माफी मागावी.

आठवले यांना हे वक्तव्य करण्यास कोणी भाग पाडले, याचा खुलासा त्यांनी करावा. आम्ही संख्येने कमी असू पण आम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीवेळी आमची ताकद दाखवून देऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Jatra 2026: श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर, म्हापशात कार्यक्रमांची रेलचेल; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Vasco: वास्कोत ‘सीसीटीव्ही’ बनले शोभेची वस्तू! गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नादुरुस्त कॅमेरे चर्चेत; कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित

Goa Live News: जागृत पर्यावरण प्रेमींसोबत; आमदार आरोलकर यांनी दिली ग्वाही

अग्रलेख: अनागोंदी कारभार पाहणाऱ्या, शिव्या ऐकणाऱ्या सामान्य गोंयकाराच्या तोंडी एकच प्रश्‍न आहे, ‘कुठे नेऊन ठेवणार गोवा?’

Goa Politics: 'जी गोष्ट भाजपची तीच विरोधकांची'! झेडपी निवडणूक निकालानंतरच्या राजकीय घडामोडी

SCROLL FOR NEXT