Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आरक्षण मिळवण्यासाठी एसटी समाज सरसावला!

2003 साली अनुसुचित जमातीचा (एसटी) दर्जा प्राप्त होऊनही राजकीय आरक्षणापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमात समाजाने आरक्षणासाठी लढा उभारण्याची तयारी सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: 2003 साली अनुसुचित जमातीचा (एसटी) दर्जा प्राप्त होऊनही राजकीय आरक्षणापासून वंचित असलेल्या या अनुसूचित जमात समाजाने आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

काल मडगाव येथील रवींद्र भवनात अखिल गोवा अनुसूचित जमात संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी अडचणी सोडविण्याबाबत चर्चा झाली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संघटनेचे सरचिटणीस रूपेश वेळीप यांनी सांगितले, की 11 रोजी सांसदीय समितीच्या 30 सदस्यांचे गोव्यात आगमन होत असून त्यांची भेट घेतली जाईल. त्यांना राजकीय आरक्षणासाठी संसदेत मुद्दा मांडण्याची मागणी करणार आहोत.

कालच्या बैठकीत एसटीसाठीच्या निधीचा विनियोग, नोकरभरती, कृषी योजना, लोकसंख्या सर्वेक्षण या सारख्या अपुर्ण मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये शशांक वेळीप, रामा काणकोणकर आदी मंडळी उपस्थित होती.

गोव्यात विधानसभेत एसटी समाजासाठी कमीत कमी 4 जागा आरक्षित होणे आवश्यक आहे. एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न हा केंद्र सरकारचा असून तसेच या संदर्भात निर्णय घेण्यासाठीची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे.

सध्या याबद्दलची चळवळ तसेच जागृती सुरू आहे. 2024 पूर्वी आरक्षण न मिळाल्यास पुढे काय करायचे त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.

- गोविंद शिरोडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT