Sports Minister Govind Gaude on 37th National Games Goa Dainik Gomantak
गोवा

37th National Games: कांपाल येथे 20 ऑक्टोबरपर्यंत तयार होणार स्पोर्ट्स सिटी; 17 ऑक्टोबरपासून खेळाडूंचे होणार आगमन

क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

Akshay Nirmale

Govind Gaude: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक गोष्टींना फिनिशिंग टच दिला जात आहे. कांपाल येथे या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सिटी उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत स्पोर्ट्स सिटी उभारली जाईल, असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

बाहेरून येणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी ही स्पोर्ट्स सिटी असणार आहे. येथे त्यांची राहण्याची, खाण्याची सोय असणार आहे. कांपाल येथे ही क्रीडा नगरी उभारली जात आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे. बरेचसे काम पूर्णही झाले आहे. या कामातही सध्या फिनिशिंग टच देण्याचे काम केले जात आहे.

पूर्ण स्पोर्ट्स सिटी 20 ऑक्टोबरला तयार होईल, असे क्रीडा मंत्री गावडे यांनी सांगितले आहे. विविध राज्यांच्या खेळाडू 17 ऑक्टोबरपासून गोव्यात यायला सुरू होतील. दरम्यान, पाऊस आला तर पर्यायी व्यवस्थाही केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याशिवाय पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होऊपर्यंत स्मार्ट सिटीची कामे थांबवा, अशी विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना, खेळाडूंना शहरात कोणतीही अडचण जाणवू नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तत्पुर्वी 19 ऑक्टोबरपासूनच स्पर्धांना सुरवात होणार आहे.

राज्यातील विविध 28 केंद्रांवर विविध स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. देशभरातील सुमारे दहा हजारावर खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT