Sports infrastructure issues in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: गोवा क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक ‘रडार’वर! काही केंद्रांवर शून्य प्रशिक्षणार्थी; अचानक तपासणीत खुलासा

Goa Sports Authority: एसएजी कार्यकारी संचालकांच्या अचानक तपासणी आदेशानंतर काही केंद्रांवर शून्य ते सात प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे सिद्ध झाले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील क्रीडा प्रशिक्षण कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने गोवा क्रीडा प्राधिकरणाने (एसएजी) महत्त्वपूर्ण पाऊले उचलली असून नियमित प्रशिक्षण केंद्रांची (आरसीसी) अचानक तपासणी सुरू आहे, त्यात उत्तर गोव्यातील काही केंद्रांवर प्रशिक्षणार्थींची संख्या शून्य असल्याचे उघडकीस आले.

एसएजी कार्यकारी संचालक गीता नागवेकर यांनी चार एप्रिल रोजी आदेशान्वये प्रशिक्षण विभागाचे प्रमुख संदीप मार्टिन वरळीकर यांची अचानक तपासणीसाठी नियुक्ती केली असून संदीप यांनी केंद्रांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. गतआठवड्यात त्यांनी उत्तर गोव्यातील दहा केंद्रांना भेट दिली, त्यापैकी चार केंद्रांवर एकही प्रशिक्षणार्थी नसल्याचे दिसून आले. संदीप यांनी यासंदर्भात अहवाल एसएजी कार्यकारी संचालकांना सादर केला असल्याची माहिती आहे.

राज्यातील प्रशिक्षण प्रणालीत अधिक व्यावसायिकता आणि पारदर्शकता आणणे, तसेच सार्वजनिक निधीचा प्रभावी वापर आणि खेळाडूंना अधिक चांगले परिणाम मिळवून देणे हा आहे.

संबंधित प्रशिक्षकांकडून मागितले स्पष्टीकरण

एसएजी कार्यकारी संचालकांच्या अचानक तपासणी आदेशानंतर काही केंद्रांवर शून्य ते सात प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे सिद्ध झाले. प्राप्त माहितीनुसार, संदीप वरळीकर यांच्या अहवालानुसार संबंधित केंद्रांच्या प्रशिक्षकांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. शिवाय गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या ९ एप्रिल रोजीच्या स्मरणपत्रानुसार, प्रशिक्षकांच्या रजा अर्जांचे बारकाईने मुल्यांकन प्रशिक्षण संचालकाद्वारे केले जाणार असून प्रशिक्षकास रजा मंजुरीसाठी वैध कारण द्यावे लागेल, तसेच नियमित प्रशिक्षणात व्यत्यय येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याची खात्री करावी लागेल.

राज्य क्रीडा संघटनांचा पाठिंबा

नियमित प्रशिक्षण केंद्रावरील (आरसीसी) अचानक पाहणी उपक्रमाला राज्यातील क्रीडा संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि गोवा टेबल टेनिस असोसिएशनसह अनेक राज्य क्रीडा संघटनांनी या सुधारणांचे स्वागत केले आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणास सहकार्य करणे, प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि गोव्याच्या क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन या दोन्ही संघटनांतर्फे करण्यात आले आहे.

काही प्रशिक्षकांबाबत तक्रारी

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील बहुतेक प्रशिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत, मात्र काही प्रशिक्षकांबाबत वारंवार तक्रारी आहेत. या प्रशिक्षकांची नियुक्ती असलेल्या केंद्रांवर प्रशिक्षणार्थींच्या संख्येत घट झालेली आहे. याची गोवा क्रीडा प्राधिकरणाने गांभीर्याने दखल घेतली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT