WTT Star Contender Tournament Dainik Gomantak
गोवा

WTT Star Contender Tournament: फ्रान्सचा फेलिक्स पुरुष एकेरीत विजेता

WTT Star Contender Tournament: महिलांत तैवानच्या चेंग हिला जेतेपद

किशोर पेटकर

WTT Star Contender Tournament: फ्रान्सचा 17 वर्षीय जागतिक क्रमवारी आठव्या स्थानी असलेला फेलिक्स लेब्रून याने वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर 2024 स्पर्धेत पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले.

महिला एकेरीत तैवानची चेंग आय-चिंग विजेती ठरली. स्पर्धेतील अंतिम लढती रविवारी पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात झाल्या.

फेलिक्स लेब्रून याने अंतिम लढतीत दोन गेम्स गमावल्यानंतर ब्राझीलियन ह्युगो काल्देरानो याच्याविरुद्ध विजयी मुसंडी मारली. फेलिक्सने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या खेळाडूस ४-२ (९-११, ९-११, १३-११, ११-०, १५-१३, ११-७) असे हरविले.

गतवर्षी गोव्यात झालेल्या या स्पर्धेत चेंग आय-चिंग उपविजेती ठरली होती. यावेळेस तिने जर्मनीच्या निना मिट्टेल्हॅम हिला नमवून करंडक पटकावला. चेंग हिने सामना ४-० (११-८, ११-८, १७-१५, ११-६) असा सहजपणे जिंकला.

स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत शिन युबिन व लिम जाँगहून जोडीने विजेतेपद प्राप्त केले. दक्षिण कोरियन जोडीने स्पेनच्या अल्व्हारो रॉबल्स व मारिया शियाओ जोडीस ३-० (११-२, १२-१०, १३-११) असे नमविले.

पुरुष दुहेरीत दक्षिण कोरियाच्या लिम जाँगहून व ॲन जेएह्यून जोडीने बाजी मारली. त्यांनी पॅट्रिक फ्रँझिस्का व डँग कियू जोडीला ३-० (११-९, ११-९, ११-७) असे नमविले.

महिला दुहेरीत दक्षिण कोरियाच्याच जेओन जिही व शिन युबिन जोडीची सरशी झाली. त्यांनी चोई ह्योजू व जू चेओनहुई जोडीवर ३-१ (११-४, ११-४, १५-१७, ११-६) अशी मात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT