I-League Football Dainik Gomantak
गोवा

I-League Football: पिछाडीवरून चर्चिल ब्रदर्सची बरोबरी

I-League Football: आय-लीग: शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल, श्रीनिदी डेक्कनला रोखले

किशोर पेटकर

I-League Football: चर्चिल ब्रदर्सने दोन गोलच्या पिछाडीवरून शेवटच्या सात मिनिटांत दोन वेळा अचूक नेम साधत आय-लीग फुटबॉल स्पर्धेत श्रीनिदी डेक्कन संघाला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. सामना रविवारी हैदराबाद येथे झाला.

चर्चिल ब्रदर्सविरुद्ध विजय हुकल्यामुळे श्रीनिदी डेक्कनच्या विजेतेपदाच्या प्रयत्नांनाही धक्का बसला. त्यांचे 20 लढतीनंतर 40 गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे व ते आठ गुणांनी मागे आहेत.

त्यांची ही चौथी बरोबरी ठरली. अव्वल स्थानी असलेल्या कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंगचे ४८ गुण आहेत. चर्चिल ब्रदर्सने स्पर्धेतील सहावी बरोबरी नोंदविली.

त्यांचे 20 सामन्यांतून 24 गुण झाले असून गोव्यातील संघ नवव्या क्रमांकावर आहे. स्पर्धेतील तीन सामने बाकी असताना विजेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी श्रीनिदी डेक्कनला रविवारी विजय मिळविणे अत्यावश्यक होते.

सामन्याच्या चौथ्या मिनिटास विल्यम अल्वेस द ऑलिव्हेरा याने, तर ३९व्या मिनिटास लालरोमाविया याने केलेल्या गोलमुळे हैदराबादचा संघ २-० असा आघाडीवर होता आणि विजयाच्या दिशेने कूच होती.

मात्र ८३व्या मिनिटास स्टेन्डली फर्नांडिसने, तर ८९व्या मिनिटास लामगौलेन सेमखोलून याने केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने बरोबरीच्या एका गुणाची कमाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT