Cooch Behar Trophy 2023 Dainik Gomantak
गोवा

Cooch Behar Trophy: चंडीगडची संथ फलंदाजी; गोव्याच्या गोलंदाजांचा प्रभावी मारा

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy: गोव्याच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना विशेष स्वातंत्र्य दिले नाही, त्यामुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी चंडीगडला संथ फलंदाजीस प्राधान्य द्यावे लागले.

स्पर्धेच्या अ गटातील चार दिवसीय सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने 6 बाद 268 धावा केल्या होत्या.

शनिवारी सकाळी त्यांचा पहिला डाव २९८ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा चंडीगडने पहिल्या डावातील ७२ षटकांत ३ बाद १८० धावा केल्या होत्या. ते अजून ११८ धावांनी मागे आहेत.

चंडीगडचा सलामीचा फलंदाज बलराज सिंग याने संयमी फलंदाजी करताना २२८ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ७८ धावा केल्या आहेत. त्याने कर्णधार पारस याच्यासमेवत चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची अभेद्य भागीदारी नोंदविली.

संक्षिप्त धावफलक:-

गोवा, पहिला डाव: (६ बाद २६८ वरुन) ः १०७.१ षटकांत सर्वबाद २९८ (यश कसवणकर ६९, स्वप्नील गावकर १३, युवराज सिंग ०, रुद्रेश शर्मा ४, दर्शन महेंद्रकर नाबाद ०, अनमोल शर्मा ४६-३, पारस ५१-२).

चंडीगड, पहिला डाव: ७२ षटकांत ३ बाद १८० (बलराज सिंग नाबाद ७८, निखिल कुमार २५, पारस नाबाद ४२, पुंडलिक नाईक ११-४-१९-०, स्वप्नील गावकर ११-५-२०-०, युवराज सिंग १६-७-२३-१, रुद्रेश शर्मा ११-६-२५-१, यश कसवणकर ११-१-४०-१, दर्शन महेंद्रकर ८-१-२८-०, शंतनू नेवगी ४-०-११-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT