Nanda Lolayekar Trophy Dainik Gomantak
गोवा

Nanda Lolayekar Trophy: 42 व्या नंदा लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेवर मडगाव क्रिकेट क्लबची मोहोर

Nanda Lolayekar Trophy Cricket: अंतिम लढतीत आर्लेम क्लबवर मात

किशोर पेटकर

Nanda Lolayekar Trophy Cricket: मडगाव क्रिकेट क्लबने अंतिम लढतीत आर्लेम स्पोर्टस क्लबवर चार विकेटने मात करून 42 व्या नंदा लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. माशे क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेतील अंतिम सामना काणकोण तालुक्यातील दापट-माशे येथील निराकार मैदानावर झाला.

विजेत्या मडगाव क्रिकेट क्लबला फिरता करंडक व 50, 000 रुपये, तर उपविजेत्या आर्लेम क्लबला करंडक व तीस हजार रुपये बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील सर्व बक्षिसे कॉमनवेल्थ डेव्हलपर्सचे संचालक चिराग दत्ता नायक यांनी पुरस्कृत केली होती.

सुदेश प्रभुदेसाई, शरेंद्र नाईक, डॉ. सुरेंद्र नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. संतोष सतरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

संक्षिप्त धावफलक: आर्लेम स्पोर्टस क्लब: ३५ षटकांत ९ बाद २१३ (राजशेखर हरिकांत ४९, प्रथमेश गावस ४३, आदित्य धुमाळ ३९, रोहित नाईक २३, आर्यन मिश्रा ३-५५, कीथ पिंटो २-३८, अमोघ देसाई २-३९) पराभूत वि. मडगाव क्रिकेट क्लब: ३३.१ षटकांत ६ बाद २१६ (अमोघ देसाई ९२, अनिकेत पोरोवाल ४५, शंतनू नेवगी नाबाद ४२, सुमीरन आमोणकर १५, शुभम देसाई ३-४१, धीरज यादव २-३८).

वैयक्तिक बक्षिसे

- अमोघ देसाई- अंतिम सामन्याचा आणि स्पर्धेचा मानकरी

- आर्यन मिश्रा- उत्कृष्ट गोलंदाज

- राजशेखर हरिकांत- उत्कृष्ट फलंदाज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT