Azan Thota & Rahul Mehta Dainik Gomantak
गोवा

C. K. Nayudu Cricket: अझान, राहुलच्या शतकांमुळे त्रिशतकी मजल

C. K. Nayudu Cricket: केरळविरुद्ध गोव्याच्या 4 बाद 312 धावा

किशोर पेटकर

C. K. Nayudu Cricket: सलामीचा अझान थोटा (१३१) व कर्णधार राहुल मेहता (नाबाद १०२) याच्या शानदार शतकांच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने केरळविरुद्ध पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारली.

सांगे येथील जीसीए मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाने ४ बाद ३१२ धावा केल्या.

आंध्र व छत्तीसगडविरुद्ध मागील सामन्यांत गोव्याचा संघ फलंदाजीत अतिशय कमजोर ठरला होता, मात्र घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार फलंदाजी केली.

मध्यंतरी दोन धावांत तीन विकेट गमावल्यामुळे गोव्याची ४ बाद २३० अशी घसरगुंडी उडाली, मात्र कर्णधार राहुलने पियुष यादव याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.

दिवसअखेर राहुलने १०२ धावा करताना १७४ चेंडूंतील खेळीत १५ चौकार व एक षटकार मारला. पियुष २४ धावांवर खेळत आहे.

अझानचे स्पर्धेतील दुसरे शतक

त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अझान व अभिनव तेजराणा (४३) या डावखुऱ्या फलंदाजांनी गोव्याला दणकेबाज सलामी दिली. उपाहाराला गोव्याने बिनबाद १०८ धावा केल्या होत्या.

मात्र पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर अभिनव बाद झाला. त्याने ८४ चेंडूंतील खेळीत तीन चौकार व एक षटकार मारला.

नंतर अझान व राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. आंध्रविरुद्ध ११६ धावांची खेळी केलेल्या अझानने यंदाच्या स्पर्धेतील दुसरे शतक नोंदविले.

वैयक्तिक १३१ धावांवर तो बाद झाला. त्याने १६२ चेंडूंतील खेळीत १९ चौकार व तीन षटकार मारले. त्यानंतर कौशल हट्टंगडी (०) व आयुष वेर्लेकर (०) दोन धावांत बाद झाल्यामुळे गोव्याची घरसगुंडी उडाली, मात्र नंतर राहुलने पियुषसह संघाचे नुकसान होऊ दिले नाही. कर्णधाराने स्पर्धेतील पहिले शतकही नोंदवून फॉर्म प्रदर्शित केला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद ३१२ (अझान थोटा १३१, अभिनव तेजराणा ४३, राहुल मेहता नाबाद १०२, कौशल हट्टंगडी ०, आयुष वेर्लेकर ०, पियुष यादव नाबाद २४, अखिन १-६३, पवन राज २-४९, अहमद इम्रान १-३७).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT