Goa Chess Association Dainik Gomantak
गोवा

राज्याला बुद्धिबळात नाव कमवायचे असेल तर 'या' गोष्टीची आहे गरज, संघटनेने केलीय क्रीडामंत्र्यांकडे 'ही' मागणी

क्रीडामंत्री गावडे यांची ग्वाही: राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Goa Chess Association गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेत सध्या फक्त तीनच बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत. त्याकडे लक्ष वेधत गोवा बुद्धिबळ संघटनेच्या नवीन कार्यकारिणीने क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याकडे राज्यात सुव्यवस्थित बुद्धिबळ प्रशिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना करण्याची ग्वाही क्रीडामंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर व इतर पदाधिकारी उपाध्यक्ष अरविंद म्हामल, दामोदर जांबावलीकर, सत्यवान हरमलकर, संयुक्त सचिव कालिदास हरवळकर, अमोघ नमशीकर, तसेच सत्तरी संघटनेचे गिरीश गाडगीळ यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ क्रीडामंत्री गावडे यांना भेटले.

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने महेश कांदोळकर यांनी क्रीडामंत्र्यांसमोर राज्य बुद्धिबळास भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. राज्यातील बाराही तालुक्यात किमान एक बुद्धिबळ प्रशिक्षक आवश्यक असून पणजी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

संघटनेचे अनुदान गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे रखडले आहे. त्यावर तोडगा काढावा अशी विनंतीही क्रीडामंत्र्यांना करण्यात आली. यासंदर्भात योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री गावडे यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT