Goa Chess Association Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Chess Association Election : बुद्धिबळाच्या पटावर खासदार तेंडुलकर ‘चितपट’

महेश कांदोळकर नवे अध्यक्ष: सात तालुका संघटनांची एकजूट अबाधित, निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chess Association Election गोवा बुद्धिबळ संघटना कार्यकारी समितीच्या पाच जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, संघटनेचे माजी सचिव किशोर बांदेकर व त्यांचा गट पराभूत झाला.

बारापैकी सात तालुका संघटनांची एकजूट अबाधित राहिली व तीच अखेरीस निर्णायक ठरली. अकरा पदांवर या गटाला स्थान मिळाले.

राज्यसभेतील मुदत संपत आलेल्या खासदार तेंडुलकर यांना पुन्हा एकदा गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष बनणे शक्य झाले नाही.

यापूर्वी ते 2013-17 या कालावधीसाठी अध्यक्ष होते. रविवारी पणजीत झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार तिसवाडीचे महेश कांदोळकर यांना 14 मते मिळाली व ते विजयी झाले.

धारबांदोडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार तेंडुलकर यांना सहाच मते मिळाली. बारा तालुका संघटनांतील प्रत्येकी दोघा प्रतिनिधींना मतदानाचा हक्क होता.

निवडणूक पीठासीन अधिकारी प्रभाकर तिंबले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया झाली. त्यांना गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे सहकार्य लाभले. सात उमेदवार ऑगस्ट 2021मधील निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध ठरले होते.

सचिवपदी सासष्टीचे आशेष केणी निवडून आले. त्यांनी काणकोणच्या शरेंद्र नाईक यांचा 14-6 मतफरकाने पराभव केला. याच फरकाने बार्देशच्या विश्वास पिळर्णकर यांनी खजिनदारपदासाठी मुरगावचे किशोर बांदेकर यांना हरविले. दक्षिण गोवा संयुक्त सचिवपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते.

फोंड्याचे अमोघ नमशीकर यांना सर्वाधिक 14 मते मिळाली, तर सांगेचे किशोर गावस देसाई यांना सहा मते मिळाली.

2021-2025 या कालावधीसाठी निवडणून आलेल्या कार्यकारी समितीत गावस देसाई हे प्रतिस्पर्धी गटातील एकमेव उमेदवार आहेत. केपे तालुक्याचे समीर नाईक यांना चार मते मिळाल्याने ते पराभूत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT