Goa speaker Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

सभापतींच्या मनाचा मोठेपणा! महाराष्ट्रातील अनाथ भावंडांना रमेश तवडकर घर बांधून देणार

सांगली, मिरजमधील आरग गावात अनाथ आणि बेघर झालेल्या भावंडांसाठी सभापती घर बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Pramod Yadav

Goa speaker Ramesh Tawadkar

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काणकोणमध्ये श्रम धाम उपक्रमांतर्गत गरजू लोकांसाठी 20 घरे बांधून दिली आहेत. सभापती आता या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील अनाथ भावंडांना घर बांधून देणार आहेत.

सांगली, मिरजमधील आरग गावात अनाथ आणि बेघर झालेल्या भावंडांसाठी सभापती घर बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आरग ग्रामपंचायतीचे सरपंच एस. एस. नाईक यांनी याबाबत सभापती तवडकर यांच्याकडे पत्राद्वारे अनाथ भावंडांसाठी घराची मागणी केली होती.

मौजे आरग ता. मिरज येथील रहिवाशी शिवा विष्णू पवार व ओम विष्णू पवार ही दोन मुले अनाथ झाली आहेत. त्यांचे वडील विष्णू मारुती पवार यांचे डिसेंबर 2018 आणि आई राजश्री पवार यांचे फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले.

Miraj, Sangli

अचानक आलेल्या या संकटामुळे त्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खालावलेली आहे. त्यांना स्वतःची जागा आहे परंतु राहणेसाठी घर नाही. त्यांची आर्थिक परिस्थितीमुळे बेताची असल्यामुळे त्यांना घर बांधणे शक्य नाही. आपल्या मार्फत सदर अनाथांना घर बांधून मिळावे, अशी मागणी सरपंच नाईक यांनी केली होती.

दरम्यान, सभापती तवडकरांनी मनाचा मोठेपणा दाखवत यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तवडकर यांनी स्वत: मिरजेत जाऊन श्रमदानाच्या माध्यमातून अनाथ भावंडांना घर बांधून दिले जाईल, असे आश्वासन दिले.

विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून त्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करेन, असेही तवडकर म्हणाले.

सभापती रमेश तवडकरांनी त्यांच्या मतदारसंघात गरजूंना 20 घरे बांधून दिली. गेल्यावर्षी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या घर मालकांना सुपूर्द करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT