Kokan Railway Dainik Gomantak
गोवा

South Western Railway: अखेर सहा दिवसांनंतर रेल्वेमार्गावरील दरड हटविली; 3 ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक सुरू होणार

मालवाहतूक सुरू: रेल्वे ट्रॅकची चाचणी यशस्वी

गोमन्तक डिजिटल टीम

Kokan Railway: दरड कोसळल्याने गेले सहा दिवस ब्रागांझा घाट विभागातील कॅसलरॉक आणि करंझोळ दरम्यानचा बंद असलेला दक्षिण पश्चिम रेल्वेचा मार्ग आज सुरू झाला. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरून सध्या मालवाहतूक सुरू केली आहे.

सध्या या मार्गावरील वास्को ते बेळगाव दरम्यानची प्रवासी वाहतूक बंद असून 3 ऑगस्टपासून या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

मुसळधार पाऊस असूनही सतत आणि अथक प्रयत्नांनंतर ब्रागांझा घाट विभागातील कॅसलरॉक आणि करंझोळ स्थानकांदरम्यानच्या रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात आली आहे.

आज दुपारी 12 वाजता ट्रॅक दुरुस्त करण्यात आला आणि तो वाहतुकीसाठी सक्षम असल्याचे प्रमाणित करण्यात आले, अशी माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे यांनी दिली.

सुरक्षेच्यादृष्टीने ट्रॅकच्या सुस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आज एक लोकोमोटिव्ह ट्रॅकवर चालविण्यात आला आणि चाचणी केली गेली, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली असून दुपारी ३.३० च्या सुमारास एक मालगाडी या रेल्वेमार्गावरून धावली. खबरदारीचा उपाय म्हणून ताशी १० कि.मी. वेगमर्यादा घालण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक:-

वास्को बेळगाव दरम्यानची प्रवासी वाहतूक उद्यापर्यंत बंद ठेवण्यात आली असून या मार्गावरील गाड्या बेळगावहून पुढे धावणार आहेत. २ ऑगस्ट रोजी दिल्लीहून येणारी गोवा एक्सप्रेस वास्कोपर्यंत येणार असून ३ ऑगस्टपासून वास्कोहून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, अशी माहिती अनिश हेगडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT