Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: लोकसभा निवडणूक तयारीचा पक्ष निरीक्षकांकडून आढावा; दक्षिण गोव्यात स्क्रीनिंग कमिटीची बैठक

Goa Congress: मधुसूदन मिस्त्री यांनी स्क्रीनिंग कमिटीची बैठक घेतली असून ते काँग्रेस नेत्यांशी व्यक्तिशः बातचीत करत आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Congress: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून गोव्यातही सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षानेही तयारी सुरु केली असल्याची दिसून येतेय.

दक्षिण गोव्यात काँग्रेस कार्यालयामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांनी स्क्रीनिंग कमिटीची बैठक घेतली असून ते काँग्रेस नेत्यांशी व्यक्तिशः बातचीत करत आहेत.

यावेळी सदस्य सूरज हेगडे आणि शफी पारंबिल यांनी आज शनिवारी मडगाव येथे काँग्रेसच्या विविध नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्याचे समजतेय.

आज त्यांनी गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, युरी आलेमाओ, क्वेपेम आमदार अल्टोन डीकोस्टा, कार्लोस फेरेरा, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिसो सरधिना, गिरीश चोडणकर तसेच संघटना प्रमुख आणि इतर प्रमुख नेत्यांशी त्यांनी चर्चा केल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.

सध्या राज्यात चाललेले पक्षाचे काम, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तसेच संभाव्य उमेदवाराबाबतही एआयसीसी निरीक्षकांनी आमच्याकडून आढावा घेतल्याचे अमित पाटकर यांनी सांगितले.

दरम्यान दक्षिण गोव्यातील निवडणुकीसाठी इच्छुकांपैकी एल्व्हिस गोम्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "मला या बैठकीची माहिती देण्यात आलेली नाही" असे सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी 'आप'चे अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात येऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तयारीचा आढावा घेतला होता.

तसेच राज्यातील पक्षाचे आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती.

गोव्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून गोव्यात 'आप'शिवाय पर्याय नाही असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT