Dhanagar Samaj In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे मागणी केली.

दैनिक गोमन्तक

Goa: धनगर समाजाला अजूनही अनुसूचित जमातीचा व आदिवासी दर्जा मिळालेला नाही. गोव्यातही धनगर समाजाबाबत हाच प्रश्र्न कायम आहे. यावेळच्या लोकसभा अधिवेशनात मला बोलण्याची संधी मिळाली. मी अनेक प्रश्र्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे मागणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा आपल्याला पाठिंबा देताना महाराष्ट्रातही धनगर समाजाला हा दर्जा देण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री मुंडा यांनी या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू, अशी ग्वाही दिली. मात्र, आदिवासी दर्जा देण्यासंदर्भात ठोस आश्र्वासन दिले नसले तरी आपण यावर सकारात्मक विचार करू, असे ते म्हणाले.

पश्र्चिम बगल रस्ता खांबावर उभारावा, याकडेही लोकसभेचे लक्ष वेधले. बाणावली व कोलवा येथील नागरिकांना हा रस्ता खांबावर हवा आहे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते, हेही त्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

Goa Cultural: गोव्यातील गणपतीची अनोखी काष्ठशिल्प परंपरा! च्यारी-चितारी समाजाच्या हातातून साकारलेले लाकडी गणेशरूप, शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा

SCROLL FOR NEXT