Fly91 flight cancellation news Dainik Gomantak
गोवा

Goa-Solapur Flight Cancelled: गोव्याहून निघालेलं विमान माघारी परतलं; सोलापूरात नाईट लँडिंगची गैरसोय

Solapur Night landing Issue: गोव्याहून सोलापूरकडे जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले

Akshata Chhatre

मोपा: अलीकडेच सुरु झालेल्या सोलापूर ते गोवा विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, गोव्याहून सोलापूरकडे जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन पावसाळी सुट्ट्यांमध्ये अनेकांनी गोव्यात सहलीचे नियोजन केले होते, मात्र ही विमानसेवा ठप्प झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडले

फ्लाय ९१ या विमान कंपनीला तांत्रिक कारणामुळे शनिवारी (दि.१२) रोजी संध्याकाळचे उड्डाण रद्द करावे लागले. हे विमान उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरून ४.५ मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण करणार होते, यांनतर तांत्रिक कारणामुळे वैमानिकांनी उशीर होणार असल्याचे जाहीर केले. मात्र पुढे ६.३० पूर्वी सोलापूरात उतरणे शक्य नसल्याने अखेर हे उड्डाण रद्द करावे लागले.

गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने या सर्व प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे बिघडले. विमानतळ प्राधिकरण अधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले असून, सर्व प्रवाशांना तिकिटाचे शंभर टक्के पैसे परत केले जाणार आहेत.

एक महिन्यातच सेवेवर प्रश्नचिन्ह?

सोलापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, मात्र या कमी कालावधीत १३०० हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता. अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी, यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT