Bhatle Water Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Bhatle, Goa: भाटले येथे जलवाहिनी फुटली! स्मार्टसिटीच्या कामांवेळी घडला प्रकार; मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी

Bhatle Water Pipeline Burst: भाटलेतील धनलक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीमागे रविवारी दुपारी (2 फेब्रुवारी) जलवाहिनी फुटल्याने येथील परिसरात पाणीच पाणी झाले.

Manish Jadhav

Bhatle Water Pipeline Burst: भाटलेतील धनलक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीमागे रविवारी दुपारी (2 फेब्रुवारी) जलवाहिनी फुटल्याने येथील परिसरात पाणीच पाणी झाले. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे स्थानिकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ताळगावच्या मुख्य टाकीत पाणी वाहून नेणारी ही जलवाहिनी असल्याने या समस्येचा ताळगावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दररोजच्या कटकटींमुळे आता स्थानिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान येथील स्थानिक नगरसेवकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. 

प्रशासनाचा भोंगळ कारभार

इमेजिन पणजीच्या नावाने स्मार्ट सिटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पणजीच्या विविध भागात ही कामे सुरु आहेत. परंतु पपणजीवासीयांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठीक-ठिकाणी खोदकाम

दुसरीकडे, राजधानी पणजीत (Panaji) स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामामुळे ठिकाठिकाणी रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात येत आहेत. काम झाल्यावर त्यावर माती घालण्यात येते. मात्र, अवजड वाहने त्या मातीवरुन गेल्यावर माती खचल्याने वाहने अडकून पडण्याची तसेच कलंडण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील खोदकामामुळे रस्त्यांवर खड्डे असून वाहनांचे किरकोळ अपघात तसेच धुळीच्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT