Goa SIR Voter List Revision Dainik Gomantak
गोवा

Goa Voter List Revision: मतदारयादीतून नावे वगळलेल्या हजारो मतदारांना दिलासा; फॉर्म 6 भरण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदत!

goa voter list special summary revision sir: मतदारयाद्यांच्‍या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेत राज्‍यातील ज्‍या १,३९,६३४ मतदारांना फॉर्म ६ द्वारे आवश्‍यक कागदपत्रांसह आपली नावे पुन्‍हा मतदारयादीत समाविष्‍ट करता येणार आहेत, त्‍यासाठी तात्‍पुरती २६ ऑक्‍टोबर ही तारीख देण्‍यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मतदारयाद्यांच्‍या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) प्रक्रियेत राज्‍यातील ज्‍या १,३९,६३४ मतदारांना फॉर्म ६ द्वारे आवश्‍यक कागदपत्रांसह आपली नावे पुन्‍हा मतदारयादीत समाविष्‍ट करता येणार आहेत, त्‍यासाठी तात्‍पुरती २६ ऑक्‍टोबर ही तारीख देण्‍यात आली आहे. त्‍यातूनही जे शिल्लक राहतील, त्‍यांना मतदारयादी उजळणीदरम्‍यान आपली नावे समाविष्‍ट करता येणार आहेत. त्‍यामुळे मतदारयादीतून नावे वगळलेल्‍या हजारो मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोव्‍यासह सर्वच राज्‍यांतील मतदारयाद्यांतील अपात्र मतदारांची नावे वगळून मतदारयाद्या सुधारण्‍यासाठी केंद्र सरकारने काही महिन्‍यांपूर्वी देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत राज्‍यातील १,३९,६३४ मतदार अपात्र असल्‍याचे जाहीर करीत त्‍यांची नावे याद्यांमधून वगळण्‍यात आली. या प्रक्रियेत घोळ असल्‍याचा आरोप काँग्रेससह इतर सर्वच विरोधी पक्षांनी केल्‍यानंतर आणि त्‍यावरून आंदोलने पेटण्‍यास सुरुवात झाल्‍यानंतर केंद्र सरकारने वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांना पुन्‍हा संधी देण्‍याचा निर्णय घेतला.

त्‍यानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वच राज्‍यांच्‍या मुख्‍य निवडणूक आयुक्तांना ज्‍या भागांतील मतदारांची नावे यादीतून वगळण्‍यात आलेली आहेत, त्‍यांच्‍या घरी ‘बीएलओं’ना पाठवून आणि संबंधितांना फॉर्म ६ देऊन नावांच्‍या समावेशासंदर्भात त्‍यांच्‍याकडून अर्ज घेण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार राज्‍यातील मुख्‍य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेला गती दिलेली आहे.

याबाबत ‘गोमन्‍तक’शी बोलताना उपमुख्य निवडणूक अधिकारी अक्षया आमोणकर म्‍हणाल्‍या, ‘‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या निर्देशांनुसार मुख्‍य निवडणूक आयोगाने फॉर्म ६ सह ‘बीएलओं’ना मतदारयाद्यांतून नावे वगळलेल्‍यांपर्यंत पोहोचण्‍याच्‍या सूचना केल्‍या असून, त्‍यांची यादी तयार करून ‘बीएलओ’ त्‍यांच्‍यापर्यंत पोहोचत आहेत.’’ ‘‘ज्‍या मतदारांची नावे वगळण्‍यात आलेली होती, त्‍यांच्‍याकडून आवश्‍यक ती कागदपत्रे घेऊन पात्र मतदारांच्‍या नावांचा मतदारयाद्यांत समावेश करण्‍याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. त्‍यासाठी तात्‍पुरती २६ ऑक्‍टोबर ही तारीख देण्‍यात आलेली आहे.

सरदेसाईंच्‍या आरोपांची दखल

‘‘कुडतरी मतदारसंघांतील ५० पेक्षा अधिक मतदारांच्‍या नावांचा यावेळी फातोर्डा मतदारसंघात समावेश करण्‍यात आल्‍याच्‍या आमदार तथा गोवा (Goa) फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांच्‍या तक्रारीची आपण दखल घेतली आहे. त्‍याबाबतची आवश्यक माहिती गोळा करण्यात आली असून प्रत्यक्ष पडताळणीचे काम सुरू आहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आपण त्‍यावर भाष्य करू’’, असे राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोवा देशासाठी विकासाचे मॉडेल! मुख्‍यमंत्र्यांचे राहुल गांधींना खणखणीत प्रत्‍युत्तर, म्हणाले, 'ही यात्रा नव्हे तर जत्रा'

Horoscope 20 Oct 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर धनलाभाचा उत्तम योग! नोकरी-व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभ वाढवणार संपत्ती; मेहनतीचे मिळणार गोड फळ

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

SCROLL FOR NEXT