Goa SIR Dainik Gomantak
गोवा

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Goa SIR Minority Targeting Claim: मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनात (एसआयआर) राज्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असा स्पष्ट दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनात (एसआयआर) राज्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असा स्पष्ट दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी केला. एसआयआरवरून विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असून, निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी एसआयआरवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणाचा संदर्भ देत, एसआयआरसह संबंधित निर्णय सर्व निवडणूक आयुक्तांच्या संमतीने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पराभवानंतर काँग्रेसकडून आयोगाला दोष

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला दोष देण्याची पद्धत आहे. यापूर्वी काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) प्रश्न उपस्थित करून त्यांना ‘ब्लॅक बॉक्स’ म्हटले होते. मात्र, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये काँग्रेस विजयी झाल्यानंतर त्याच ईव्हीएमच्या वापराबाबत पक्षाने आक्षेप घेतला नाही, असे ते म्हणाले.

जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी विरोध का नाही?

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर झाला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. त्यामुळे केवळ निवडणूक आयोग किंवा मतदान पद्धतीला दोष देणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT