MP Shripad Naik And Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Parliament Session 2024: गोव्याचे दोन्ही खासदार शपथबद्ध; नाईकांनी संस्कृत तर विरियातोंनी कोकणीतून घेतली शपथ

Parliament Session 2024 Goa MP: उत्तरेत श्रीपाद नाईक एक लाखांहून अधिक तर दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस जवळपास चौदा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Pramod Yadav

Parliament Session 2024 Goa MP

लोकसभा निकालानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांनी सदस्यपदाची शपथ घेतली. गोव्याच्या दोन्ही खासदारांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली.

श्रीपाद नाईक यांनी संस्कृतमधून तर विरियातो फर्नांडिस यांनी कोकणीतून सदस्यपदाची शपथ घेतली.

गोव्यात दोन्ही जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. उत्तर गोव्यातून भाजपच्या श्रीपाद नाईक यांच्या विरोधात काँग्रेस तथा इंडिया आघाडीच्या रमाकांत खलप यांचे आव्हान होते. तर, भाजपने महिला उमेदवार पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देऊन प्रतिष्ठेच्या केलेल्या दक्षिण गोव्यात काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस उभे होते.

दोन्ही जागेवर त्यांचे उमेदवार विजयी होतील असा दावा करणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या हाती निराशा आली व दोन्ही पक्षांना त्यांचे पारंपरिक गढ राखण्यात यश आले. उत्तरेत श्रीपाद नाईक एक लाखांहून अधिक तर दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस जवळपास चौदा हजार मतांनी विजयी झाले आहेत.

लोकसभेच्या निकालानंतर पहिल्याच अधिवेशनासाठी दिल्लीत गेलेल्या गोव्यातील दोन्ही खासदारांनी आज सदस्यपदाची शपथ घेतली.

त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. त्यापाठोपाठ मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. विकसित भारत 2047 च्या अंतर्गत गोवा विकसित करण्यासाठी मोदींच्या कडून मार्गदर्शन आणि सल्ला घेतला, असे सावंत यांनी ट्विट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

SCROLL FOR NEXT