Goa: मासळी बाजार तुकाराम सावंत
गोवा

Goa : सोमवारपासून श्रावण मासारंभ

Goa: चिकन, मासळीला येणार तेजी, दर मात्र स्थिर

Tukaram Sawant

डिचोली - गोवा (Goa) (Dicholi-Goa) पूर्ण शाकाहारी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या श्रावण महिन्याला येत्या सोमवारपासून प्रारंभ होत असून, श्रावण (Shravan month )महिन्याच्या पूर्वदिनी उद्या (रविवारी) डिचोलीत मासळीसह चिकन, मटण (chicken) खरेदीला तेजी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी डिचोलीत बॉयलर कोंबड्यांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. उद्या रविवार असल्याने चिकन, मटणाला मोठी मागणी होण्याची शक्यता असली, तरी दर स्थिर राहणार असल्याचे संकेत चिकन विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.
श्रावण महिना म्हटला की, शाकाहाराचा काळ. हिंदू (hindu) धर्मात या महिन्याला शास्रोक्त महत्व आहे.बहूतेकजण पूर्ण श्रावण महिना ते चतुर्थीनंतर येणाऱ्या अनंतचतुर्दशीपर्यंत जवळपास दिड महिना मांसाहार वर्ज्य करतात. यंदा येत्या सोमवारपासून श्रावण मासारंभ होत आहे. त्यातच या महिन्याला सुरवात होण्यापूर्वी रविवार आल्याने उद्या मासळीसह चिकन, मटण आणि अंडी खरेदीला तेजी येण्याची शक्यता आहे. बार आणि रेस्टॉरंटमधूनही मागणी वाढणार आहे. काही मांसाहारी खवय्यानी आजच मासळी, चिकन खरेदी करून उद्याची व्यवस्था करून ठेवली आहे.

महिन्यापूर्वी स्थानिक कुकूटपालन फार्ममध्ये बॉयलर कोंबड्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि राज्याबाहेरूनही बॉयलर कोंबड्यांची आवक घटल्याने मागील जुलै महिन्यात बॉयलर चिकनच्या दरात २० रूपयांनी वाढ झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. सध्या बॉयलर कोंबडी १४० ते १५० रू. किलो तर सुटे चिकन २५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. अंड्यांचे दरही उतरले असून, अंडी ६० रुपये डझन तर ४८०रूपये १०० नग याप्रमाणे विकण्यात येत आहे. बकऱ्याचे मटण मात्र ८०० रू.किलो या दराने विकण्यात येत आहे. उद्या चिकन, मटणाला मागणी वाढणार असली, तरी दर स्थिर राहणार असल्याचे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. डिचोलीत दरदिवशी सरासरी १ हजार ते बाराशे किलो चिकनची विक्री होत असते. उद्या त्यात दुप्पट वाढ होणार असल्याचा अंदाज एका चिकन विक्रेत्याने व्यक्त केला आहे. महिन्यापासून वाढलेले मासळीचे दर स्थिर आहेत. उद्याही हे दर कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT