Pramod Sawant, Narayan Rane  Dainik Gomantak
गोवा

Goan Industries: गोव्याने खाणकाम आणि पर्यटनावर अवलंबून राहू नये तर...केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सुचवला विकासाचा मार्ग

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोव्याने BSE SME IPO सह सामंजस्य करार केला.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याने केवळ खाणकाम आणि पर्यटनावर अवलंबून न राहता उद्योगक्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे असे मत  केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. गोवा MSME अधिवेशन येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोव्याने BSE SME IPO सह सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व विविध योजना आणि प्रोत्साहनांचा वापर करून त्यांचे व्यवसाय आणि गोव्याची अर्थव्यवस्था वाढवण्याचे आवाहन केले. गोव्याचे पर्यटनावरील अवलंबित्व कमी करून आर्थिकदृष्टीने संपन्नता आणण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

SCROLL FOR NEXT