गोवा

गोवा उपपिठात नवसाची पालखी

सोहळ्याला भर पावसातही भाविकांची गर्दी

दैनिक गोमन्तक

वास्को: अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम उपपीठ गोवा यांच्या भक्तसेवा मंडळातर्फे ओल्ड गोवा येथील गोवा उपपिठावर शिवमंदिरात मंगळवार दिनांक 28 जून 2022 रोजी नवसाची पालखी उत्सव सोहळ्याला भर पावसातही भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. (Goa Shiva Temple Palkhi Festival was celebrated with enthusiasm )

दर महिन्याच्या अमावास्येला शिवमंदिरात पालखी परिक्रमा केली जाते. आज साजरा करण्यात आलेल्या नवसाची पालखी उत्सव सोहळ्याचे यजमानपद उत्तर कन्नड जिल्हा ( पूर्व कारवार व पश्चिम जोयडा) लाभले होते. या पालखी सोहळ्याला गोवा सहित, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, बेळगांवी, उत्तर कन्नड,जोयडा, कारवार मधिल भाविक भक्त, हितचिंतकांची प्रामुख्याने उपस्थित राहून नवसाच्या पालखीचा मनमुराद आनंद लुटला.

जून महिना म्हटला की धो धो पावसाचे दिवस, परंतु या धो धो पावसालाही न जुमानता हजारों भाविकांनी गोवा उपपिठावर आयोजित नवसाच्या पालखीत समावेश होऊन पालखीत ढोल ताशांच्या गजरात, टाळ दिडीच्या तालावर भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन पालखी परिक्रमा आनंद लुटत होते.

मंदिरातील दर्शन सेवेसहीत, पार्किंग, पालखी परिक्रमा, प्रसादाचे वाटप अशी सर्वच सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संग्राम सैनिकांनी कशी नियोजन बद्ध करावी हे उत्कृष्टपणे करता येते याची जाणीव करून दिली. आजच्या नवसाच्या पालखी उत्सव सोहळ्याला गोवा, उत्तर कन्नड, पूर्व कारवार, पश्चिम जोयडा, बेळगावी, ग्रामीण बेळगावी, शहर बेळगावीचेही संग्राम सैनिकांनी आपापली सेवा उत्कृष्टपणे बजावली. त्याप्रमाणे नवसाची पालखी सोहळा असल्याने नव - नवीन भाविक, हितचिंतक नवस करण्यासाठी व केलेले नवस श्रींच्या चरणी अर्पण करण्यासाठी पालखीत उपस्थितीत राहून श्रींचे कृपार्शिवाद घेतला.

नवसाच्या पालकी उत्सव सोहळ्याला सकाळी काकड आरतीने सुरुवात‌ करण्यात आली. तद्नंतर होम हवन पूजेचा कार्यक्रम झाला. तसेच प्रत्यक्ष ( 18 ) व अप्रत्यक्ष( 14 ) अभिषेक करण्यात आले. दुपारी व रात्री महानैवेद्याचा कार्यक्रम, संध्याकाळी ठिक 5 वाजता ढोल ताशांच्या गजरात, ताळ मृदुंग ताला सुरात भोलेनाथांची मुर्ती व प.पू. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांची तसबीराची मंदिराच्या परिसरात पालखीतून परिक्रमा काढण्यात येते,यात भक्त, शिष्य, साधक हितचिंतक नाचण्यात मंत्रमुग्ध होऊन आपले पूर्ण देहभान विसरून पालखी परिक्रमा काढण्यात आली आजच्या नवसाच्या पालखी उत्सव सोहळ्याला 1800 ते 2200 हून भाविकांची उपस्थिती लाभली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT