Goa Shipyard  Dainik Gomantak
गोवा

'गोवा शिपयार्ड नोकरभरतीत होत आहे घोटाळा'

मंत्री गुदिन्हो यांचा आरोप: मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्र्यांकडे करणार तक्रार

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा शिपयार्डमध्ये नोकरभरतीत मोठा घोटाळा सुरू असून, शिपयार्डने गोमंतकीय तरुणांना नोकरी देण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे, असा आरोप पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. नोकर भरतीचा प्रश्‍न मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्र्यांसमोर नेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

नोकरभरतीच्या वेळी गोवा शिपयार्ड स्थानिकांना डावलते. गोवा शिपयार्डच्या नोकर भरतीच्या जाहिराती गोव्यापेक्षा इतर राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये अधिक प्रमाणात देण्यात येतात. गोवा शिपयार्डने गोमंतकीयांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवेवाडे येथे राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानला सौरऊर्जा निर्मिती प्रणाली पुरस्कृत कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रोळी जय संतोषी माता संस्थानचे अध्यक्ष तुळशीदास पटेकर, नगरसेवक विनोद किनळेकर, प्रकाश गावस, अनिता थोरात, घन:श्याम गडेकर, अशोक झेमणे आदी उपस्थित होते.

गुदिन्हो म्हणाले, शिपयार्डकडून नोकरभरतीच्या बहुतांश जाहिराती गोव्याबाहेरील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येतात. त्यांना नोकरीसाठी स्थानिक नव्हे तर राज्याबाहेरील उमेदवार हवे आहेत, हे त्यामुळे स्पष्ट होते. यापैकी काहींना इंग्रजी येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यांना शिपयार्डमध्ये योग्य प्रशिक्षण देऊन नोकरीत समावून घेतले जाते. शिपयार्डच्या अशा कार्यपद्धतीमुळे गोमंतकीय संतापलेले असून, ते याविरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यापैकी अनेक तरुणांना मी शांत केले आहे. भविष्यात गोमंतकीय तरुणांना नोकरी न मिळाल्यास लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा मंत्री गुदिन्हो यांनी दिला.

नोकऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय

जीएसएल नोकऱ्यांसाठीच्या जाहिराती इतर राज्यांच्या वृत्तपत्रांमध्ये अधिक प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे त्यांना नोकऱ्यांसाठी बाहेरील लोकांची गरज आहे, हे स्पष्ट आहे. जीएसएलमध्ये नोकऱ्यांचे एक मोठे रॅकेट आहे, ते स्थानिकांना काम देत नाही, असा आरोप पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT