Goa Shipyard  Dainik Gomantak
गोवा

गोवा शिपयार्डने लक्षद्वीपसाठीच्या जहाजाचे केले जलावतरण

सिंथिया कॉन्सेसिओं यांच्या हस्ते करण्यात आले जलावतरण

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा शिपयार्ड लिमिटेडने केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपसाठी बांधलेल्या एलपीजी सिलिंडर वाहक जहाजाचे जलावतरण आज करण्यात आले. हे जलावतरण गोवा शिपयार्डच्या वरिष्ठ महिला कर्मचारी श्रीमती सिंथिया कॉन्सेसिओं यांच्या हस्ते करण्यात आले.

(Goa Shipyard launched the vessel for Lakshadweep)

सुमारे दोन हजार सिलिंडर वाहून नेण्यासाठी गोवा शिपयार्डने हे जहाज विकसित व डिझाईन केले आहे. लक्षद्वीपच्या विविध बेटांपर्यंत एलपीजी सिलिंडर वाहून नेण्यासाठी हे जहाज सर्वांत आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत यंत्रणा व नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज आहे. सर्व आवश्यकतांची पूर्तता करून समुद्रामध्ये स्थिरता राखण्याच्या उद्देशाने हे जहाज एक कार्यक्षम हुल फॉर्मसह तयार केले आहे.

या जहाजाची लांबी 55 मीटर असून 10 मीटरच्या बीमसह तीन डिजी संच व दोन 700 बीएचपी इंजिनांनी सुसज्ज आहे. गोवा शिपयार्डने बाजी मारताना दोन जहाजांचे कंत्राट मिळविले आहे.

जलावतरण ही गोवा शिपयार्डसाठी एक मोठी उपलब्धी आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड- 19 मुळे आव्हाने आली असली तरी, आम्ही हे जहाज निर्धारित वेळेत पूर्ण केले याचे आम्हाला समाधान आहे. दुसरे जहाजही लवकरच जलावतरण करण्यात येईल. असे गोवा शिपयार्ड लिमिटेडचे उपाध्यक्ष ब्रजेश कुमार यांनी म्हटले आहे.याप्रसंगी गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्यय, कॅप्टन जगमोहन तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT