Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड कंपनीला बेकायदा परवाना; 'PDA' कडूनही नियमभंग!

Goa Shipyard: वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी असा आरोप करुन पुन्‍हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड कंपनीने मुरगाव नगरपालिकेला अंधारात ठेवून आपल्या नवीनच बांधलेल्या प्रशासन इमारतीला पालिका संचालकांकडून निवासी दाखला मिळवून घेतलाय. विशेष म्‍हणजे या इमारतीला मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणानेही परवाना देताना सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी करून पुन्‍हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

इमारतीला निवासी दाखला घेण्यासाठी गोवा शिपयार्डने प्रथम मुरगाव पालिकेकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु कंपनीने दाखला मिळविण्‍यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला आहे, असे आल्मेदा म्‍हणाले.

तसेच नवीन प्रशासन इमारत बांधल्यानंतर आपली संरक्षक भिंत नियमानुसार मोडणे गोवा शिपयार्ड कंपनीचे कर्तव्‍य होते. पण या कंपनीने तेथेसुद्धा कायद्याचे उल्लंघन करून सरकारविरोधात जाण्‍याचे धाडस केले आहे, अशी टीका त्‍यांनी केली.

दरम्‍यान, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक विनोद किनळेकर, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनीही गोवा शिपयार्ड कंपनीच्‍या कृतीचा निषेध करून सरकारने तातडीने योग्‍य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

नगरनियोजन कायदाही पायदळी

नवीन इमारत बांधताना मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार बांधकाम राष्ट्रीय महामार्गपासून काही मीटर अंतरावर करणे आवश्‍‍यक आहे. गोवा शिपयार्ड कंपनीने नवीन प्रशासन इमारत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस बांधल्यानंतर पूर्वीची आपली संरक्षक भिंत पाडणे गरजेचे आहे.

पण कंपनीने येथेही नगरनियोजन खात्‍याच्‍या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा दावा आल्मेदा यांनी केला. मुरगाव पालिकेने गोवा शिपयार्डला दिलेला निवासी दाखला मागे घेण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक बोलावून त्‍यावर निर्णय घेता येईल, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT