Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: डिचोलीत 'घोडेमोडणी'चा जल्लोष; हजारो नागरिकांचा सहभाग

'घणचे कटर घण'चा रंगला ताल

Akshay Nirmale

Goa Shigmotsav 2023: हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या 'घणचे कटर घण'च्या तालावर गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानची "घोडेमोडणी' शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली.

सायंकाळी चार घोडेस्वार साजविल्यानंतर गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानकडून ढोल-ताशांच्या तालावर "घोडेमोडणी"ला सुरवात झाली.

गाऱ्हाणे घातल्यानंतर ढोल-ताशांच्या ठेक्यावर घोडेस्वारांनी ताल धरला. सुरवातीस आतीलपेठ येथे तीन आणि नंतर गावकरवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर परिसरात पाच फेरे मारल्यानंतर पारंपरिक पद्धतीने घोडेमोडणीची सांगता झाली.

घोडेमोडणीचा आस्वाद घेण्यासाठी गावकरवाडा ते कायरो हॉस्पिटलपर्यंत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

शुक्रवारी पाच ठिकाणी घोडेमोडणी

शुक्रवारी (ता. 10) डिचोली शहरासह सर्वण, मये, कुडचिरे आणि लाडफे मिळून पाच ठिकाणी परंपरेप्रमाणे घोडेमोडणी साजरी होणार आहे.

गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान आणि लाडफे येथील श्री सातेरी केळबाई देवस्थानची घोडेमोडणी सायंकाळी तर मये येथील श्री माया केळबाय देवस्थान, कुडचिरे आणि सर्वण येथील श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवस्थानची घोडेमोडणी रात्री साजरी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT