Utorda shack damage Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

Jamming Goat Utorda: ही घटना पहाटे घडल्याने शॅकमध्ये कोणीही ग्राहक नसल्याची शक्यता आहे, जीवितहानी झाल्याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Akshata Chhatre

मडगाव: दक्षिण गोव्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या उत्तर्डा बीचवरील 'जॅमिंग गोट' या शॅकला रविवार (दि.२१) पहाटे अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण शॅक आगीच्या विळख्यात सापडला, मात्र अद्याप या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पर्यटकांची पहिली पसंती असलेलं ठिकाण

'जॅमिंग गोट' हे केवळ एक सामान्य बीच शॅक नसून ते आपल्या खास खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध होते. सामान्य शॅक्सच्या तुलनेत येथे मिळणारे वेगळे आणि चविष्ट पदार्थ, उत्कृष्ट कॉकटेल आणि मनमोहक वातावरण यामुळे पर्यटकांमध्ये या शॅकची मोठी क्रेझ होती. विशेषतः या शॅकचे रूफटॉप सीटिंग आणि थीमवर आधारित सजावट पर्यटकांना आकर्षित करत असे

परिसरात खळबळ

लॉइड्स बीच शॅकच्या शेजारीच असलेल्या या शॅकला पहाटे आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत शॅकचे फर्निचर, स्वयंपाकघरातील साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने, ही घटना पहाटे घडल्याने शॅकमध्ये कोणीही ग्राहक नसल्याची शक्यता आहे. जीवितहानी झाल्याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आता पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

पहिल्यांदाच गाजवणार 'तेलगू' सिनेसृष्टी! अक्षय खन्ना साकारणार अजेय शुक्राचार्य; अंगावर शहारे आणणारा लूक Viral

ॲशेसवर कांगारुंची मोहोर! WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची बादशाहत कायम; इंग्लंडच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा की तोटा?

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

SCROLL FOR NEXT